बीड प्रतिनिधी - तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालय बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पदवी विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची 149 वी जयं
बीड प्रतिनिधी – तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालय बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पदवी विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची 149 वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.एम.थोरात यांची उपस्थिती होती. तर विचार मंचावर डॉ.योगिता लांडगे, प्रा. प्रकाश ढोकणे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.किशोर वाघमारे यांनी तर डॉ. विकास वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी डॉ.भाग्यश्री पवार, प्रा.अंकुश सुर्वे, प्रा.शिल्पा बोराडे, प्रा.समीर मिर्झा,प्रा.पूजा पाटील, प्रा.राहुल सोनवणे, प्राची पाठक, किर्ती जोगदंड, बबन पांचाळ, अमर ससाणे, प्रा.हनुमंत विद्यागर,प्रा. प्रकाश गायकवाड ,प्रवीण रंगदळ, हर्षकुमार कांबळे, स्वप्निल साळवी ,ऋषिकेश पंडित, प्रिती शिंदे आदींची उपस्थिती होती.
COMMENTS