Homeताज्या बातम्यासंपादकीय

छगन भुजबळ हे नेते नव्हे, तर, ओबीसींच्या शोषकांचे हस्तक ! 

नगर दक्षिण मतदार संघातून आमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, या मतदारसंघात खळबळ उडाली. ही खळबळ राज्याच्या सत्ताधाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. सत्ताधाऱ्या

संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!
राधेश्याम मोपलवावर : कल्पक नव्हे, महाराष्ट्राला कफल्लक करणारा अधिकारी!
भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 

नगर दक्षिण मतदार संघातून आमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, या मतदारसंघात खळबळ उडाली. ही खळबळ राज्याच्या सत्ताधाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. सत्ताधाऱ्यापर्यंत ही बाब पोहोचल्या बरोबर, सत्ताधाऱ्यांचे हस्तक असणारे, परंतु वरकरणी सत्ताधारी दिसणारे छगन भुजबळ यांनाच ती अधिक खटकली. त्यांनी नगर दक्षिण मतदार संघातील ओबीसी म्हणविल्या जाणाऱ्या माळी या जाती घटकातील काही लोकांना हाताशी धरले. ही बाब एवढी टोकाला पोहोचली की, काल नगर दक्षिण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा उमेदवाराची रॅली निघाली असताना, त्या रॅलीमध्ये सत्ताधारींचे हस्तक व तथाकथित ओबीसी म्हणविणाऱ्या नेत्याचे हस्तक मोठ्या प्रमाणात सामील होते. याचा अर्थ ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण करणारा मराठा समुदाय, यांच्याशी ओबीसींचा समन्वय झाला आहे का? जर तसे नसेल तर मग ओबीसी नेते म्हणविणाऱ्या छगन भुजबळ यांनी नगर दक्षिण मतदार संघातील या परिस्थितीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. आमची उमेदवारी ओबीसी राजकीय आघाडीने जाहीर केल्याबरोबर छगन भुजबळ यांचे काही हस्तक, ज्यांची कोणतीही प्रतिमा या मतदारसंघांमध्ये नाही, त्यांची कोणतीही ताकद या मतदारसंघांमध्ये नाही, केवळ हस्तकाचे हस्तक एवढीच त्यांची ओळख आहे. ज्या सत्ताधार्यांचे हस्तक छगन भुजबळ आहेत, त्यांचे हस्तक या ठिकाणी उपद्रव मूल्य उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते आणि आहेत! परंतु, आमचा सामाजिक विस्तार इतका प्रचंड आहे की, त्यापुढे या हस्तकांचे काहीही चालले नाही.  म्हणून हे हस्तक शेवटी त्यांची ओबीसींवर अन्याय करणारी भूमिका घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा उमेदवाराच्या रॅलीमध्ये सामील झाले. राजकारणामध्ये ओबीसी अस्मिता जागृत झाली असताना आणि ओबीसी राजकीय आघाडीने – आम्ही सत्तेवर आल्याबरोबर किंवा आमचा एक जरी प्रतिनिधी संसदेत गेला तरी तो – सर्वात पहिली भूमिका जर कुठली मांडणार असेल तर ती म्हणजे ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी मराठा समुदायाला जे ओबीसी किंवा कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात आहे, ते रद्द करणे ही आमची सर्वप्रथम मागणी असेल!  ही मागणी घेऊनच आम्ही आमच्या राजकीय अजेंड्यावर आमची उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीला प्रत्यक्ष मूर्त रूप येण्यापूर्वीच छगन भुजबळ यांनी या मतदार संघात आपला माळी, धनगर, वंजारी चा परंपरागत संघवादी अजेंडा आळवला!  याचाच अर्थ छगन भुजबळ हे ओबीसींचे स्वायत्त अथवा स्वतंत्र नेतृत्व नसून ते परिस्थितीजन्य हस्तक पद स्वीकारत राहतात! मराठा समाज जर सत्तेत असेल तर ते मराठा समाजाचे किंवा सत्ताधाऱ्यांचे हस्तक असतात; तर, जेव्हा भारतीय जनता पक्षासारखा पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा, ते संघ-भाजपचे हस्तक असतात, असे आमचे ठाम निरीक्षण आहे. कायम हस्तकाची भूमिका निभावणारी व्यक्ती ही ओबीसींचा नेता कशी होऊ शकते? हे एकदा आम्हाला नगर दक्षिण मधल्या तथाकथित ओबीसी नेत्यांनी समजून द्यायला हवे. आम्ही तर असे मानतो की, हस्तक हा मध्यस्थापेक्षाही क्षुल्लक असतो. कारण मध्यस्थ हा दोन घटकांची बाजू समजून घेऊन, त्यांच्यातले समान दुवे नेमके हेरून त्यांच्या लक्षात आणून देतो.  दोन्ही घटकांमध्ये काही समन्वय किंवा परस्परावलंबी संबंध विकसित होतात का, यासाठी तो प्रयत्न करतो. परंतु, हस्तक हा कुठल्याही पद्धतीने मध्यस्थ सारखा दोन घटकांमध्ये समन्वय घडवत नाही. तर तो कुठल्यातरी वरचढ एका घटकांकडून वापरला जातो.  न्यायाच्या, हक्काच्या, लढ्यासाठी जो घटक तयार होतो, त्याच्या विरोधात जाऊन तो सत्ताधार्यांचा हस्तक बनलेला असतो. असा नेता हा खरे तर ओबीसींची अस्मिता, ओबीसींचा अधिकार, ओबीसींचा न्याय डावलण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना मदत करत असतो.  हे सत्ताधारी केवळ राजकीय नसतात तर, जातीय पातळीवर ते ओबीसींचे आणि खास करून बहुजन समाजाचे शोषकही असतात.  शोषकांच्या हातून खेळवले जाणारे अशा प्रकारचे हस्तक नेते,  कधीही ओबीसींचे कल्याण करू शकत नाही!  ओबीसींच्या राजकीय सत्तेसाठी आणि त्यांच्या व्यापक अस्मितेसाठी हे कधीही उभे राहू शकत नाही, हे आमचे आजही ठाम मत आहे.

COMMENTS