Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी चेतन कासव

नाशिक प्रतिनिधी - राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार चेतन कासव यांच

विकासाच्या बाबतीत दक्षिण भागावर कायमच अन्याय – अ‍ॅड.प्रताप ढाकणे
बीड तालुक्यात तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती

नाशिक प्रतिनिधी – राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार चेतन कासव यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी चेतन कासव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, अन्न व नागरी स्वरंक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

चेतन कासव यांनी या अगोदर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पद भूषवलेले असून त्यांच्यावर आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी मा. खा. समीर भुजबळ, युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. यापुढील काळात पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष श्रेष्ठींनी दिलेले जबादारी सार्थ ठरवू तसेच लवकरात लवकर नवीन जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी केले. त्यांच्या या नियुक्ती चे रोहित पाटील, पराग गांगुर्डे, राजेश हाडपे, राहुल पाठक, सुरेश गांगुर्डे, सुयश मेणे, निखिल बच्छाव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

COMMENTS