मुंबई ः भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा मिळण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमधील प्रवा
मुंबई ः भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा मिळण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमधील प्रवाशांनाच आतापर्यंत जेवण मिळत होते. मात्र, आता जनरल डब्यात देखील प्रवाशांना स्वस्त दरात जेवण देण्याची सुविधा भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. त्यामुळे आता जनरल डब्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या अनारक्षित म्हणजेच जनरल डब्यांतून प्रवास करणार्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या डब्यातून अनेक सामान्य नागरिक हे प्रवास करत असतात. या डब्यातील गर्दी पाहता बर्याचवेळा प्रवाशांना बाहेर रेल्वे स्थानकावर जाऊन जेवण घेणे शक्य नसते. तसेच रेल्वे स्थानकावरील जेवणाचे दर देखील जास्त असतात. त्यात चांगल्या दर्जाचे जेवण मिळेल याची देखील शाश्वती नसते त्यामुळे नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या या डब्यातील प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने आता आरक्षित डब्यांप्रमाणेच अनारक्षित म्हणजेच जनरल डब्यातील प्रवाशांना कमी दरात जेवण उपलब्ध करून देणार आहेत. मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आईआरसीटीसीच्या सहकार्याने प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये अर्थात जनरल डब्यांमध्ये स्वस्त दरात स्वच्छतापूर्ण अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये प्रवास करणार्या लोकांसाठी ही योजना सुरू केली. हे दर परवडण्यासारखे आहेत. मध्य रेल्वेने 100 स्थानकांवर प्रवाशांना स्वस्तात जेवण देण्याची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागात पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा मिळू लागली आहे.
COMMENTS