Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारुदत्त ढेकणे यांनी मृत्यूनंतर केले नेत्रदान

कोपरगाव शहर : सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असून पणती पेटवून हा सण सर्वजण साजरा करतात परंतु दुसर्‍याच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांच् आयुष्य

शिर्डी विमानतळासाठी 876 कोटींच्या निधीस मान्यता
गौरी शुगर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार : बोत्रे पाटील
शिंदे-फडणवीसांच्या काळात औद्योगिक वीज वापर वाढला

कोपरगाव शहर : सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असून पणती पेटवून हा सण सर्वजण साजरा करतात परंतु दुसर्‍याच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांच् आयुष्य प्रकाशमय करून मृत्यूनंतर स्वतःच नेत्रदान करून दोन अंध व्यक्तीच आयुष्य प्रकाशमय करून त्यांच्या आयुष्यातील अंधकार कायमचा दूर करण्याच काम माहेगाव देशमुख येथील चारुदत्त ढेकणे यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, चारुदत्त ढाकणे व त्यांच्या पत्नी पुणे येथे कर सल्लागार म्हणून काम करत होत्या दीपावली निमित्त ते त्यांच्या मूळ गावी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आले असता सकाळी मॉर्निग वॉक करत असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला परंतु त्यांना आपल्या मृत्यू नंतर नेत्रदान करायच आहे ही इच्छा त्यांनी त्यांच्या घरच्याना सांगितली होती मृत्यू नंतर त्यांचा पत्नीने ही गोष्ट सांगितली यावर त्वरित त्यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आला व नेत्रदान तसेच अवयवदान, देहदान समुपदेशक, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनी संपूर्ण प्रक्रिया करून त्यांचं नेत्रदान करून घेतले. यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ गिरीश, गुट्टे, डॉ. हूलारे, डॉ. आतिष काळे, तोसिफ शेख, विक्रम वाल्मिक तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉ. अनन्या, डॉ. हिमानी तसेच माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थ उल्लास काळे, रवींद्र काळे, दत्तत्रय काळे, सचीन देशमुख, बारकू चोथे, भाऊ जीवन ढेकणे, मुलगा ओंकार, पत्नी सुचेता ढेकणे आदीचे सहकार्य लाभले त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मरावे परी नेत्ररूपी उरावी हे वाक्य ढेकणे यांनी सार्थ करुन दाखवले.

आपल्या शरीराच्या अवयवांचा इतर गरजूंना उपयोग व्हावा या करिता प्रत्येकाने आपले अवयव दान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन अवयवदान, देहदान समुपदेशक, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक गावित्रे यांनी केले आहे.

COMMENTS