इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू धर्मानुसार सुरू असलेल्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या-मोठ्या व्यापार्यांकडून जबरदस्तीने घेतल्या जात असलेल
इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू धर्मानुसार सुरू असलेल्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या-मोठ्या व्यापार्यांकडून जबरदस्तीने घेतल्या जात असलेल्या वर्गणीवरून व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी याबाबतचे निवेदन पोलीस अधिक्षक शशिकांत चव्हाण यांना दिले.
पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेगवेगळ्या संघटनांच्या नावाखाली सण-उत्सवासाठी व्यापार्यांकडून जबरदस्तीने वर्गणी मागितली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मनमानी पध्दतीने कार्यकर्ते स्वत:च्या मनाला येईल तो आकडा पावतीवर लिहून ती व्यापार्याकडे देतात. तसेच वसुलीसाठी उद्या येतो, असे दमदाटीच्या स्वरूपात सांगून जातात. यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.
महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील म्हणाले, विविध संघटनांच्या नावाखाली हे प्रकार सुरू असल्याचे पुरावे आमच्या हाती आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पाळेमुळे उपटून टाकावीत. यापुढे जबरदस्तीने वर्गणी मागितली गेल्यास व्यापारी महासंघातर्फे संबंधित संघटनेवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार आहोत. यावेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, रमेश चौधरी, सतीश देसाई, संतोष ढबू, संजय साळुंखे, गजानन पाटील, बाहुबली वाकळे, तुलसीभाई पटेल, राधेय शहा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
COMMENTS