Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला सुरूवात

डेहराडून ः उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 6.55 वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. हजारो भाविकांसह मुख्यम

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नांत वडील, मामाचा मृत्यू
सोनाली कुलकर्णीचे लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणार.
तैवानवर चीनकडून हल्ल्याची शक्यता (Video)

डेहराडून ः उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 6.55 वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. हजारो भाविकांसह मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही त्यांच्या पत्नीसह दर्शनासाठी पोहोचले. केदारनाथशिवाय गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजेही आज उघडणार आहेत. तर बद्रीनाथ मंदिरात 12 मेपासून दर्शनाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी दिवसाचे तापमान शून्य ते 3 अंशांवर नोंदवले जात आहे. त्याचवेळी रात्रीचा पारा उणेपर्यंत पोहोचत आहे. असे असतानाही सुमारे 10 हजार भाविक केदारनाथ धामपूर्वी 16 किमी अंतरावरील गौरीकुंडात पोहोचले आहेत.

COMMENTS