चापोरा किल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चापोरा किल्ला

उत्तर गोव्यात वेगेटार समुद्र किनार्‍याजवळ चापोरा किल्ला आहे. चापोरा नदीतून होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. चापोरा किल्

प्रबोधनाशिवाय क्रांती होणे अशक्य ः अ‍ॅड. दिलीप काकडे
निळवंडे लाभ क्षेत्रातील पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या
निळवंडेतून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी

उत्तर गोव्यात वेगेटार समुद्र किनार्‍याजवळ चापोरा किल्ला आहे. चापोरा नदीतून होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. चापोरा किल्ला चापोरा नदीच्या काठावर आहे. या किल्ल्याची उभारणी आदिलशहाने केली. या किल्ल्याचे बांधकाम १६१७ मधे पुर्ण झाले. आदिलशहामने त्याचे नामकरण शाहपुरा असे ठेवले. परनेमचे राजे आणि सावंतवाडीच्या सावंताककडे दोन वर्षे हा किल्ला होता. पोर्तुगीजांनी १७१७ मध्ये किल्ला जिंकला व किल्ल्याची पुर्नबांधणी केली.

किल्याचा परिचय :
हा किल्ला गोव्यातील वेगेटार समुद्रकिना‌‍‌र्‍यापासुन १.५ किमी अंतरावर आहे. किल्ल्यापासुन जवळचे रेल्वे स्थानक थिविम आहे. थिविम रेल्वे स्थानकापासुन हा किल्ला १८ किमी अंतरावर आहे. किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्या पर्यंत रस्ता आहे. रस्त्याने चापोरा किल्ल्याजवळ पोहोचल्यावर १५ मिनिटे चढाई करुन आपण किल्ल्याच्या आग्नेय दिशेकडील प्रवेशव्दाराने किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्यावर तीन गोल बुरुज आणि चार बाणाकृती बुरुज आहेत. किल्ल्यावर एक उधवस्त वास्तु आहे, त्या जागी पूर्वी सेंट अँथनी चर्च होते. किल्ल्यावर वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. किल्ल्यावर आपल्याला कॅप्सुल बुरुज पहायला मिळतात. 

लेख : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण

COMMENTS