लंडन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्य

लंडन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत आरजी कर कॉलेज आणि घोटाळ्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. मात्र, मुख्यमंत्री ममता यांनी परिस्थिती सांभाळत निदर्शकांना उत्तर दिले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या महाविद्यालयात महिला, मुले आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सामाजिक विकासावर बोलण्यासाठी लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये बोलावण्यात आले होते. याच विषयावर भाषण देत असताना त्यांनी बंगालच्या ’स्वास्थ्य साथी’ आणि ’कन्याश्री’ योजनांचा संदर्भ देत दिले.
येथे राजकारण करू नका ः मुख्यमंत्री बॅनर्जी
जेव्हा आंदोलकांनी आरजी कराचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तर देतांना म्हणाल्या की, ’थोडे मोठ्याने बोला, मला तुमचे बोलणे ऐकू येत नाही.’ तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन. पण तुम्हाला माहिती आहे का कि हे प्रकरण प्रलंबित का आहे? या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता केंद्र सरकारच्या हातात आहे, हे प्रकरण आता आमच्या हातात नाही. असे म्हणत त्यांनी यावर उत्तर दिले. तसेच ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ’इथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही. माझ्या राज्यात या आणि माझ्यासोबत राजकारण करा. असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले.
COMMENTS