Homeताज्या बातम्यादेश

आसाममध्ये भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान गोंधळ

गुवाहाटीमध्ये प्रवेश नाकारल्याने काँगे्रस कार्यकर्ते आक्रमक

गुवाहाटी ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यात्रेला परवान

आजचे राशीचक्र शनिवार, १३ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा | LokNews24
वाळू डेपो विरोधात. आ.गडाख ग्रामस्थांसह मैदानात
विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली शिक्षा | LOKNews24

गुवाहाटी ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यात्रेला परवानगी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांनी बॅरिकेड्स तोडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यासर्व गदारोळानंतर मुख्यमंत्री हिमंता बिश्‍व सरमा यांनी राहुल गांधींवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
आसाममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा मोठा राडा झाला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करत असतांना पोलिसांनी रोखली. दरम्यान, कॉँग्रेस कार्यकर्ते पुढे जात राहिल्याने तब्बल 5 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक कॉँग्रेस कार्यकर्ते हे जखमी झाले आहेत. राहुल गांधींसह अनेक जणांवर विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कॉँग्रेसची न्याय यात्रा सध्या आसाम येथे आहे. ही यात्रा मंगळवारी गुवाहाटी येथे जाणार होती. राहुल गांधी यांच्यासह सुमारे 5 हजार कार्यकर्ते हे गुवाहाटी येथे जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे गोंधळ निर्माण झाला. या यात्रेला रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यात लावलेले बॅरिकेट तोडून पुढे जात राहिले. यामुळे पोलिसांनी लाठी चार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया हेही जखमी झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसने गुवाहाटीच्या मुख्य मार्गाकडे जाण्याऐवजी राष्ट्रीय महामार्गाकडे जावे, असे आसाम सरकारने म्हटले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रीय महामार्ग 27 वरुन जाण्यास सांगण्यात आले होते.

हिमंता बिस्वा सरकार घाबरले; कॉँग्रेसचा आरोप – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे सरकार राहुल गांधींच्या या यात्रेला घाबरले आहे. त्यामुळेच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आसाममध्ये ही यात्रा सुरू झाल्यापासून देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आमच्या ताफ्यावर सातत्याने हल्ले करत आहेत. यासाठी गुंडांचाही वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

COMMENTS