Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव सोसायटीच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत आढाव

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्याच्या सहकारात अग्रगण्य असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत सहादू आढाव यांची

नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल
सचोटीने कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती : करण ससाणे

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्याच्या सहकारात अग्रगण्य असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत सहादू आढाव यांची सर्वानुमती बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी.नेरे होते.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत सहादू आढाव यांच्या नावाची सुचना पोपटराव नरोडे यांनी मांडली त्यास संजय वडांगळे यांनी अनुमोदन दिले. सोसायटीचे चेअरमन वैभव शंकरराव आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेने सदैव सभासदाभिमुख निर्णय घेत संस्थेच्या विकासाचा  आलेख चढता ठेवला असून संस्थेच्या प्रगतीसाठी विविध दर्जेदार कंपन्यांची खते औषधी बी बियाणे विक्रीसाठी ठेवत पेट्रोल पंप विभागात विक्री वाढीसाठी पेट्रोल व डिझेल ग्राहकांसाठी आकर्षक बक्षिसांची कुपने वितरित करण्यात येत आहे या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे चेअरमन वैभव शंकरराव आढाव नूतन व्हा. चेअरमन चंद्रकांत सहादु आढाव यांनी केले आहे. यावेळी संचालक महेंद्र पाटील, पोपटराव नरोडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, दत्तात्रय सावंत, अंबादास आढाव, प्रवीण शिंदे, रामनाथ शिंदे, संजय वडांगळे, संस्थेचे सचिव भाऊसाहेब रंगनाथ येवले, नंदकुमार भोसले आदी उपस्थित होते.

COMMENTS