मुंबई प्रतिनिधी - काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घे
मुंबई प्रतिनिधी – काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. तर आज काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे . १३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
COMMENTS