काँगे्ससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्ससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलमध्ये उलटफेर होईल, अशी शक्यता बाळगून क्रिकेटप्रेमी जसा शेवटचा बॉल होत नाही, तोपर्यंत

संवादक्रांतीतून डिजिटल क्रांतीच्या दिशेने
वेळकाढूपणामुळेच आजची परिस्थिती
निवडणुकांचे भवितव्य टांगणीला

राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलमध्ये उलटफेर होईल, अशी शक्यता बाळगून क्रिकेटप्रेमी जसा शेवटचा बॉल होत नाही, तोपर्यंत मॅच बघणे सोडत नाही. तसेच काहीसे महाराष्ट्राच्या राजकारणात होतांना दिसून येत आहे. बेबींच्या देठापासून महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षच काय तर 50 वर्ष पडणार नाही, अशी गर्जना करणारे संजय राऊत आज ईडीच्या कोठडीत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडत, भाजपमध्ये सत्तेत सहभागी झाला आहे. मात्र राजकीय घडामोडी इथपर्यंतच थांबल्यानसून, शिवसेनेनंतर आता काँगे्रसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताने पुन्हा 1857 सारखे युद्ध छेडू नये, यासाठी त्यांनी आपल्या मागण्या, सनदशीर मार्गाने मांडाव्यात, यासाठी इंग्रजांच्या पुढाकाराने 1885 मध्ये स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँगे्रस आज आपल्या अस्तित्वासाठी झगडतांना दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि काँगे्रसचे ज्येष्ठ नेते गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसून येत आहे. अर्थात या गाठीभेटी भाजप प्रवेशाच्या असल्यामुळे काल महाराष्ट्राच्या राजकारणांत खळबळ उडाली आहे. शिवाय चव्हाण एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार नसून, त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काँगे्रसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकेकाळी गावा-गावात पोहचलेली काँगे्रस आता गलितगात्र झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर काँगे्रसला अध्यक्ष नाही. काँगे्रसची होणारी वाताहात रोखण्यासाठी कोणताही सक्षम नेता नसल्यामुळे अनेक राजकीय नेते भाजपची वाट धरतांना दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर महाराष्ट्रात काँगे्रसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच काँगे्रस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असून, यातील दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. त्यामुळे राज्यात दोनच सक्षम पक्ष पहायला मिळणार असल्याचे चित्र दिसणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रस आणि भाजप. महाराष्ट्रातून तरी सध्या इतर पक्षाची मोठया प्रमाणावर वाताहात होतांना दिसून येत आहे. अशोक चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते. त्यांची मोठी क्षमता असूनही त्यांना पक्षांनी कोणतीही जबाबदारी दिलेली नव्हती. त्यामुळे चव्हाण अनेक दिवसांपासून नाराज असून, शिवाय तपास यंत्रणांचा फेरा चुकवण्यासाठी देखील ते भाजप प्रवेश करत असल्याचे बोलले जात आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत जर काँगे्रसचा मोठा गट भाजपसोबत गेल्यास भाजप एकहाती राज्यात सत्ता स्थापन करू शकतो. आणि जर मध्यावधी निवडणूका झाल्यास, तर भाजप एकहाती सत्ता मिळवू शकतो, त्यासाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा दोन्ही बाजूचा विचार करून, तयारी ठेवली आहे. त्यामुळे यात मात्र काँगे्रसचे आणि शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुळातच भिन्न विचारधारा असणारे पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा पक्षाचा मूळ मतदार तुटत असतो. ज्या काँगे्रसने आयुष्यभर शिवसेनेचा विरोध केला, तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. त्याचप्रकारे ज्या शिवसेनेने आयुष्यभर काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही, बाळासाहेब ठाकरेंनी तर अतिशय जहरी भाषेत या दोन्ही पक्षांचे वाभाडे काढले, त्याच पक्षासोबत उद्धव ठाकरे यांनी आघाडी केली. बरं आघाडी केली तर केली, मात्र त्यांनी मुख्यमंत्री व्हायला नको होतं. रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवला असता, तरी शिवसेनेचं इतकं मोठं नुकसान झालं नसतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद घेतले, आणि तेथुनच खर्‍या अर्थाने पक्षाला गळती सुरु झाली. आणि शिवसेनेतून 39-40 आमदार बाहेर पडले आहेत. तर शिवसेनेकडे 12-15 आमदार आहेेत. त्यानंतर आता काँगे्रसला देखील हीच गळती लागण्याची चिन्हे आहेत, आणि त्या गटाचे नेतृत्व अशोक चव्हाण करतांना दिसून येत आहे.

COMMENTS