Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव बा.स.चे सभापती जयदत्त नरवडे तर उपसभापती श्रीहरी मोरे.

माजलगाव प्रतिनिधी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची बिनरोध निवड झाली आहे. माजलगाव बाज

राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु
निफाड तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय तेजीत
शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

माजलगाव प्रतिनिधी – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची बिनरोध निवड झाली आहे. माजलगाव बाजार समितीची निवडणूक आ.प्रकाश सोळंके व भाजप मोहन जगताप यांनी अत्यंत अटीतटीची केली होती यात आ.सोळंके यांनी आपली सत्ता कायम राखत 18 पैकी 12 जागांवर विजय मिळवला होता. तर जगताप यांच्या पॅनेलचे 3 उमेदवार विजयी झाले तर माजी आ.राधाकृष्ण होके पाटील यांच्या गटाचे 2 तर अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झाले होते. 14मे रविवार रोजी पिठासीन अधिकारी तथा सहाय्यक दुय्यम निबंधक विकास जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात आ.सोळंकेकडून सभापती जयदत्त नरवडे तर उपसभापती पदासाठी श्रीहरी मोरे यांचे अर्ज तर मोहन जगताप यांच्याकडून सभापती करीता नितीन नाईकनवरे तर उपसभापती पदासाठी मनोज जगताप यांचे अर्ज दाखल झाले होते. परंतू नाईकनवरे व जगताप आपले अर्ज परत घेतलेल्याने सभापतीपदासाठी जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यानंतर आ.सोळंके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-आप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ,माजी सभापती संभाजी शेजुळ, अशोक डक उपस्थिती होते.

COMMENTS