नवी दिल्ली : राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मंगळवारी अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचे पडसाद बुधवारी राज्यसभा आणि ल
नवी दिल्ली : राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मंगळवारी अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचे पडसाद बुधवारी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात उमटले. या अविश्वास प्रस्तावावर बोलतांना काँगे्रसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आमचे व्यक्तिगत संघर्ष नाही. मात्र ते केंद्र सरकारचे मोठे प्रवक्ते आहेत. त्यांच्या वर्तनामुळे आम्हाला त्यांच्याविरोधात अविश्वास ठरावासाठी नोटीस आणावी लागली आहे, अशा शब्दांमध्ये खरगे यांनी हल्लाबोल केला.
खरगे पुढे म्हणाले की, राज्यसभेच्या कामकाजात सर्वात मोठा अडथळा आणण्याचे कारण स्वत: राज्यसभा सभापती यांचेच आहेत. त्यांच्या वागण्याने देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. लोकशाही, राज्यघटना आणि त्यावर बराच विचार केल्यानंतर आम्ही संसदीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठरावासाठी नोटीस आणली आहे. सभागृहात अनुभवी नेते, पत्रकार, लेखक, प्राध्यापक आहेत. शेतात काम करून अनेकजण सभागृहात आले आहेत. 40-40 वर्षांचा अनुभव आहे, अशा नेत्यांची सभापती मुख्याध्यापकांसारखी शाळा घेतात आणि प्रवचन देतात. विरोधी पक्षाचे लोक 5 मिनिटे बोलतात, तर 10 मिनिटे त्यांचे भाषण असते. सत्ताधारी आणि सभापती यांच्यात आणखी तणाव वाढला आहे. सहसा विरोधी पक्ष सभापतींकडून संरक्षण घेतात, सभापती हे संरक्षक असतात. ते पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाचे गुणगान करत असतील, तर विरोधकांचे कोण ऐकणार? त्यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक वैर, द्वेष किंवा राजकीय लढा नाही. आम्ही देशातील नागरिकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही अत्यंत विचारपूर्वक आणि मजबुरीने हे पाऊल उचलले आहे. सभापती हे राजकारणाच्या पलीकडे असतात. आज सभापती नियमापेक्षा राजकारण करत आहेत. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतील असे आंबेडकरजींनी संविधानात लिहिले आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे पहिले राज्यसभेचे सभापती राधाकृष्णन यांनी 1952 मध्ये खासदारांना सांगितले होते. याचा अर्थ मी सभागृहातील प्रत्येक पक्षाशी संबंधित असल्याचे खरगे यांनी सांगितले.
COMMENTS