Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती

प्रेमप्रकरणातून भावांनी बहिणीची हत्या करून केले तुकडे

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी : सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोन भावां

पुण्याच्या किशोर आवारे यांची हत्या
बीडमध्ये पुन्हा पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून
पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी : सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोन भावांनी आपल्या सख्ख्या बहिणीची कुर्‍हाडीने वार करून तिची निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, चंद्रकला धोडिंबा बावस्कर असे मृत महिलेचे नाव असून कृष्णा धोडिंबा बावस्कर, शिवाजी धोडिंबा बावस्कर, धोडिंबा सांडू बावस्कर आणि शेवंताबाई धोडिंबा बावस्कर अशी आरोपींची नावे आहे. फर्दापूर पोलिस ठाण्यात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या राक्षा शिवारात राहणार्‍या चंद्रकला बावस्कर यांचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना आणि भावांना होता. घरात झालेल्या वादातून कृष्णा आणि शिवाजी या दोन सख्ख्या भावांनी आपल्याच बहिणीवर कुर्‍हाडीने वार करायला सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकला यांनी जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेरील शेतात पळ काढला. परंतु दोन्ही भावांनी बहिणीचा पाठलाग करत तिच्या डोक्यात आणि छातीत कुर्‍हाडीने वार करत तिची हत्या केली. याशिवाय चंद्रकला हिला वाचवण्यासाठी आलेल्या शमीम नावाच्या तरुणावरही आरोपींनी हल्ला चढवला. त्यानंतर जखमी शमीम यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिसांनी तातडीने राक्षा शिवारात धाव घेतली. त्यानंतर मृत चंद्रकला यांचा मृतदेह पोलिसांनी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी घटनेचा पंचनामा करत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. बहिणीची हत्या करून कृष्णा आणि शिवाजी हे दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे. सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यानंतर आता लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS