बीड प्रतिनिधी - जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शिक्षकांनी आणि ईतर कर्मचार्यांनी आपण दिव्यांग असल्याचे दाखवून पोस्टिंग मिळवलेल्या आ
बीड प्रतिनिधी – जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शिक्षकांनी आणि ईतर कर्मचार्यांनी आपण दिव्यांग असल्याचे दाखवून पोस्टिंग मिळवलेल्या आहेत.विशेष म्हणजे काही जणांनी याच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरभरती मध्ये लाभ घेतलेला आहे.या सगळ्यांची माहिती सीईओ अजित पवार यांनी मागवली होती त्या तयार माहीतीचा दुरुपयोग होत असुन कारवाई ऐवजी शिक्षक आणि कर्मचार्यांच्याकडुन आर्थिक लाभ लाटण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे दिसून येते.कारवाई तर दुरच पण मलिदा लाटण्यासाठी यानिमित्ताने आधिका-यांना नामी संधी उपलब्ध झाली आहे.
बीड जिल्हा परिषद अंतर्गत मेंदू विकार असलेल्या 23 बोगस प्रमाणपत्र बाळगणा-या शिक्षकांवर स्वतः सीईओ अजित पवार यांनी आक्षेप घेत अंबेजोगाईच्या स्वराती व लातुरच्या मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठवलेले अहवाल अद्याप प्रलंबित असतानाच त्यांना दिलेली पदस्थापना संशयास्पद असुन त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची खात्रीलायक माहिती असुन संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.3 जुलै सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जवाब दो आंदोलनकरण्यात येऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, शेख मुबीन,शेख मुश्ताक, तांदळे सुदाम तसेच दिव्यांग संघर्ष समितीचे शेरखान पठाण,सलाऊद्दीन मोहंमद,शेख वजीर,बिरजू चव्हाण आदी. सहभागी होते. बीड जिल्हा परीषदेतील बोगस अपंग शिक्षकांचा मुद्दा ऐरणीवर आला होता.सीईओ अजित पवार यांनी 78 शिक्षकांना निलंबित केले होते.मात्र हे सर्व शिक्षक हायकोर्टातुन रिईस्टेट झाले.यापलिकडे 23 शिक्षक असे होते त्यांच्या अपंगावर खुद्द सीईओ अजित पवार यांनी आक्षेप घेतला होता त्यातील बहुतांश जण मेंदू विकाराशी संबंधित होते त्यांना अंबेजोगाईच्या स्वराती व लातुरच्या मेडिकल कालेजमध्ये तपासणीसाठी पाठवले होते.या सगळ्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.मात्र त्यापुर्वीच सीईओ अजित पवार यांनी या 23 शिक्षकांना पदस्थापना दिली असून या पदस्थापनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात असुन सीईओ अजित पवार यांनी हाती घेतलेल्या बोगस अपंग शोधमोहीम केवळ फार्स असल्याचे दिसून येत आहे.बोगस पदस्थापनेत अपंग प्रकरणात एका शिक्षकांकडून 2 ते 5 लाख रुपये घेऊन पदस्थापना दिल्याची माहिती जिल्हा परीषदेतील शिक्षण विभागातील विश्वसनीय सुत्रांकडून मिळते आहे.त्यामुळे संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. बदलीसाठी 1572 बदलीपात्र शिक्षकांपैकी 772 शिक्षकांनी आपण अपंग आणि मोठ्या आजाराने ग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते हे प्रमाण 50 टक्के पेक्षा जास्त होते. धनदांडगे लोक बोगस प्रमाणपत्र आधारे दिव्यांगाचे हक्क हिरावुन घेत असून त्यांच्या हक्कावर गदा येत आहे. पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ही बोगस प्रमाणपत्र धारकांची मनोधारणा व आर्थिक लाभापोटी आधिका-यांकडुन दिले जाणारे संरक्षण ख-याखु-या दिव्यांग बांधवांच्या हितासाठी बाधक आहे.
COMMENTS