जामखेड/प्रतिनिधी : संस्कृतीप्रधान भारत देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. देशात सरकार हिंदुत्ववादी आहे. हिंदु धर्मात स्त्री ही खरा दागीना आहे
जामखेड/प्रतिनिधी : संस्कृतीप्रधान भारत देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. देशात सरकार हिंदुत्ववादी आहे. हिंदु धर्मात स्त्री ही खरा दागीना आहे. असे असतांना देशाची मान गौरवाने उंच करणारया देशाच्या कन्या, महिला कुस्तीपटूंना आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी या सरकारपुढे रडत बसण्याची वेळ आली आहे. ही शरमेची बाब आहे. मुली वाचवा, मुली शिकवा महिलांचा सन्मान करा अशी जाहिरात करणारे सरकार हे महिला सन्मानाच्या विरोधी आहे असे परखड मत प्रा. मधूकर राळेभात यांनी व्यक्त केले.
दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटुंना पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कुस्तीगीर व खेळाडूंच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील कुस्तीगीर, कुस्तीप्रेमी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या देशामध्ये कुस्तीची परंपरा हजारो वर्षापासुन आहे. गोरगरीब महिला कुस्तीपटू या सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर होत असलेला अन्याय या देशात सहन केला जाणार नाही. खासदार ब्रिजभूषण या नालायकाने महिला कुस्तीपटू बरोबर गैरवर्तन केले आहे. त्याचा निषेध करत आहोत त्यावर त्वरित गुन्हे दाखल व्हावेत असे मत व्यक्त केले. यावेळी अँड अरुण जाधव म्हणाले की, महिलेचा सन्मान आम्ही करतो, बेटी बचाओ, नारी शक्ती अश्या मोठ्या हिंदूत्वाच्या गप्पा मारुण टेंभा मिरविणारे आज या महिला कुस्तीपटूंवर अन्याय झाला तरी मुग गिळून गप्प का बसले आहेत. देशाचा मान सन्मान कोण मोठ करतं तर कलाकार, खेळाडू वैधानिक, विद्यार्थी,हे देशाची मान उंचावतात . त्या भाजपाच्या खासदार ब्रिजभुषण यादवला त्याच्या कुकर्माची शिक्षा व्हायलाच पाहिजे. यावेळी प्रा मधुकर राळेभात,अँड अरुण जाधव, महिला कुस्तीपटू कु. माधुरी संतोष भोसले, कु. गौरी भाऊसाहेब शेळके, कु. दिक्षा बाळू गायकवाड, प्रा.अभिमान्यु उगले, पै.अयुब शेख, नजीरभाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद, अजिनाथ सर्जेराव शिंदे, नितिन हुलगुंडे, सुदाम मुरूमकर, विशाल आव्हाड, यांच्यासह तालुक्यातील कुस्तीगीर व कुस्तीप्रेमीं व खेळाडू हजर होते. देशासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करत पदकाची कमाई करून देशाच्या गौरवात मानाचा तुरा रोवणार्या अन्यायाच्या विरोधात जंतर मंतर दिल्ली येथे देशाच्या कन्या अंदोलनाला बसल्या आहेत. कारण कुस्ती क्षेत्राला काळीमा फासणारी घटना त्यांच्या जिवनात घडली आहे. त्यांची फिर्याद देखील या देशात घेतली जात नाही.म्हणन ऐकून घेतले जात नाही. म्हणुन या महिला कुस्तीपट्टु रस्त्यावर बसल्या आहेत.या उलट केंद्रातील भाजपाची मोदी सरकार मुग गिळून गप्प बसली आहे. भाजपा खासदार आणि भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभुषण यादववर महीला खेळाडूंवर गैरवर्तन सारखे जगन्य आरोप स्वतः या महिला खेळाडू करत असताना देखील केंद्र सरकारने अद्याप आरोपी ब्रिजभुषण यादव या खासदार व देशाच्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष या पदावर ठेवले आहे. यावरुन केंद्रातल्या या भाजपाचे मोदी सरकार हे, देशातील महिलांचे सन्मान करत नाही. ते भारतीय महिला विरोधी सरकार असल्याचे यावेळी अनेक कुस्तीपटूंनी सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
COMMENTS