Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्राने लावले कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क

राहुरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारचा पुतळा जाळला

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले. स्वाभिमानी

 शिक्षकासह नगरपालिकेच्या कामगाराचा 26 जानेवारीला करणार  सन्मान
रवंदेत महावितरणने केला महिला दिन साजरा
औताडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पोहेगावात नागरी सत्कार
देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः  केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र सरकारचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.राहुरी बाजार समितीच्या आवारातील कांदा लिलाव बंद पाडण्यात आले.

या आंदोलनात तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत केंद्र सरकारचा निषेध केला. हे सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेले आहे. अशा संतप्त भावना शेतकर्‍यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या आहे. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्याने कांद्याचे भाव कोसळणार असल्याने शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. आता कुठे कांद्याला भाव मिळण्यास सुरवात झाली होती. तोच केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के केल्याने कांद्याचे भाव कोसळले असल्याने शेतकर्‍यांनी राहुरी बाजार समितीच्या आवारातील कांदा लिलाव बंद पाडण्यात आले.यावेळी आंदोलकांसमोर बोलताना रवींद्र मोरे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखा हा निर्णय आहे. त्यामुळे निर्यातबंदी होण्याची भीती आहे. याबाबत शेतकर्‍यांच्या व्यथा केंद्र शासनाने जाणून घेतलेल्या नाहीत. प्रति किलोला दहा रुपये उत्पादन खर्च येत असताना गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. आता कुठे भाव सुधारण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. मात्र शासनाच्या पोटात दुःखू लागल्याने सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के केले आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. या सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सरकार कोणत्याही थरावर जात आहे. हा देश शेतकर्‍यांच्या जीवनावर चालू आहे. तर जगाच्या पोशिंदावर हा अन्याय का? सरकार जोपर्यंत निर्यात शुल्क मागे घेत नाही. तोपर्यंत आमचा कांदा विकणार नाही. अशी शपथ सर्व शेतकर्‍यांनी घेतली.

यावेळी केंद्र शासनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुतळा दहन करण्याच्या वेळी पोलिस व शेतकरी यांच्यामध्ये चांगली बाचाबाची झाली. जोपर्यंत निर्यात शुल्क रद्द होत नाही. तोपर्यंत बाजार समितीच्या आवारातील कांदा लिलाव सुरु करु देणार नाही. शेतकर्‍यांच्या वतीने सामुहिक निर्णय घेण्यात आला.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले, दीपक तनपुरे ,सत्यवान पवार, राऊ तनपुरे, आनंद वणे, विजय तोडमल, सचिन म्हसे, सतीश पावर, सुनील इंगळे, दिनेश वराळे, सचिन गडगुळे, सुरज नलावडे, जुगलकुमार गोसावी, प्रमोद पवार, भारत गोरे, दीपक पठारे, रवींद्र निमसे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब निमसे, विनायक शेळके, सतीश बोंबले, चांगदेव येसेकर,संदीप शिरसाठ,बाबासाहेब चोथे,राहुल करपे आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्रू अनावर झाले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलना दरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे हे भाषण करत असताना बीड जिल्ह्यातील शेतकर्‍याच्या मुलीस एसटी पाससाठी दोनशे रुपये मिळत नाही. म्हणून ती आत्महत्या करते. असे सांगत असताना रवींद्र मोरे भावनाविवश होवून त्यांना रडू कोसळले.

COMMENTS