Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम समाजाच्या वतीने ऐक्याचा संदेश देणारी पवित्र रमजान ईद साजरी

वडूज : इदगाह मैदानावर नमाज अदा करताना मुस्लिम समाज बांधव. औंध / वार्ताहर : गेली दोन वर्षांपासून करोना काळात सर्वच धार्मिक व इतर कार्यक्रमावर निर्ब

लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे
मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया महिनाअखेर होणार
साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील

औंध / वार्ताहर : गेली दोन वर्षांपासून करोना काळात सर्वच धार्मिक व इतर कार्यक्रमावर निर्बन्ध घातले होते. पण, यंदाच्या वर्षी सर्व सुरळीत झाल्याने रमजान ईद साजरी करण्यात चार चाँदचा आनंद उत्सव दिसून आला. सर्व धर्मियांच्या सहभागाने ऐक्याचा संदेश देण्यात आला.
सकाळी साडेआठ वाजता जामा मस्जिद, वडूज येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नुरी काफीला वाकेश्‍वर रस्त्यावरील इदगाह मैदानाकडे रवाना झाला. मुस्लिम समाजबांधवांना मौलाना नूर महंमद यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र नमाज पठन अदा केली. तसेच वडूज मधील सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी मंगलमय दुवा केली. यावेळी आबालवृध्दांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोकराव गोडसे, जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांनी मौलाना नूरमहंमद यांचे मनापासून कौतुक करत हिंदू-मुस्लिम भाई-भाईचा नारा दिला. यावेळी पोलीस अधिकारी दीक्षित यांचा जब्बार मुल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाजातील लोकांचे वडूज नगरीच्या विकासासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे गोडसे कुटुंबातील सदस्यांनी इदगाह मैदानासाठी नुसती जमीन दिली असे समजू नये तर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने वडूज मुस्लीम समाज्यासाठी भरीव विकास निधी भविष्यात देणार आहे, असे नम्र आवाहन केले. हा देश धार्मिक ग्रंथाचा आदर करतो. परंतु, देश हा भारतीय संविधानावर कामकाज करतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने यांनी संविधानाची प्रत भेट देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी इदगाह मैदानावर बागवान, पठाण, शिकलगार, शेख, आत्तार, तांबोळी, पिंजारी, डांगे, मणेर, काजी, सय्यद, मनोरे, खान, पटेल, मुलाणी, मुल्ला इत्यादी सर्व मुस्लिम बिरादरीच्या सर्व सुमारे सहाशे ते सातशे मुस्लिम समाजातील बांधवांनी इदगाह मैदानावर नमाज अदा केली. हा सर्व मुस्लिम धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुस्लिम समाज इदगाह कबरस्थान ट्रस्ट, वडूज महेफील, फैज नूरी ग्रुप, सेवन स्टार ग्रुप, ग्रीन टायगर ग्रुप या सर्वांनी बहुमूल्य योगदान दिले. वडूज मुस्लिम समाज्याच्या वतीने महंमद शरीफ आत्तार यांनी स्वागत केले. आयाज मुल्ला यांनी सूत्रसंचालन तर शिराज शिकलगार यांनी आभार मानले.

COMMENTS