Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळाबाह्य मुलांना सहल घडवत इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा

इस्लामपूर / प्रतिनिधी : फुटपाथवरील शाळाबाह्य मुलांना शाळेची सहल घडवत अनोख्या पध्दतीने इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. व्हॅलेंटाईनडेच्या

श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्‍वरी शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ
राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना विद्यार्थी दिनी कोमात
सातारच्या त्रिशंकू भागातील पथदिवे दोन दिवसापासून बंद

इस्लामपूर / प्रतिनिधी : फुटपाथवरील शाळाबाह्य मुलांना शाळेची सहल घडवत अनोख्या पध्दतीने इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने इस्लामपूरच्या मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे मुलांना मायेची ऊब देताना ब्लँकेट भेट देण्यात आली. शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व यावेळी सांगितले गेले.
सगळीकडेच व्हॅलेंटाईन डेचे सेलिब्रेशन दिवसभर झाले. सर्वत्र 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होत असतो. अनेकजण व्हॅलेंटाईन डे ला वेगवेगळे उपक्रम घेत असतात. इस्लामपूरातील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये सोमवारी संस्थेचे सचिव विनोद मोहिते आणि त्यांची पत्नी संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी आज फुटपाथवर मूर्ती बनवणार्‍या मुलांना शाळेची सहल घडवली. पेठ रस्त्यावर गेली सहा महिने परराज्यातून व्यवसाय करण्यासाठी काही कुटुंब आली आहेत.
प्लाष्टर ऑफ पॅरिसपासून वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या बनवण्यासाठी ते व्यस्त असतात. रस्त्याच्या कडेला मूर्ती बनवणार्‍या कुटुंबातील ही छोटी मुले भटकंती करत असतात. पाण्याचा कमी वापर, कधी स्वछता नाही. केस वाढलेले. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस अडकून मुलांच्या केसांत जटा झालेल्या अवस्थेत ही मुलं दिवसभर फिरत असतात. काही वेळा ही मुले मूर्त्या रंगवण्यासाठी मदत करतात. पण या मुलांना शिक्षणाचा अजिबात गंध नाही.
व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत मुक्तांगणमध्ये ह्या वंचित घटकातील मुलांना बोलावले गेले. दोन ते दहा वयोगटातील सुमारे 15 मुले शाळेत आली होती. शाळेच्या आवारात येताच मुले भारावून गेली. मुक्तांगणच्या मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी काहीशी मुले लाजून गेली. त्यांना संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्व पटवून दिले. राजस्थानमधून आलेली ही कुटुंबे शिवजयंती झाल्यावर स्थलांतरित होणार आहेत. तेंव्हा आम्ही मुलांना शाळेत पाठवू असे मुलांच्या पालकांनी सांगितले.

COMMENTS