Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरातील सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला वचक

पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांचे प्रतिपादन

बेलापूर ः बेलापूर गावातून बाहेर जाणार्‍या तसेच गावात येणार्‍या रस्त्यावर अकरा अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे आता परिसरात होणार्‍

नगर मर्चंटस् बँकेला 8 कोटीचा नफा
कोपरगावातील रस्त्यांसाठी 1.80 कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे
मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत

बेलापूर ः बेलापूर गावातून बाहेर जाणार्‍या तसेच गावात येणार्‍या रस्त्यावर अकरा अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे आता परिसरात होणार्‍या गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्‍वास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.
बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून अति उच्च दर्जाचे अर्धा किलोमीटरपर्यतचे चित्रण सुस्पष्टपणे करणारे अकरा कॅमेरे मुख्य चौकात बसविले त्यात बेलापुर झेंडा चौकात चार उक्कलगाव कोल्हार चौकात तीन कॅमेरे व बेलापूर श्रीरामपूर गोडी शेव रेवडी चौकात तीन  बेलापुर काँलेज जवळ एक असे अकरा कॅमेरे बसविले या कॅमेर्‍याचे नियंत्रण हे बेलापूर पोलिस स्टेशनला ठेवण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कॅमेर्‍यायाबाबत, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलीक, उपसरपंच मुस्ताक शेख, टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्याकडून सर्व सीसीटीव्हीची माहीती घेवुन समक्ष पाहणी केली. नवीन बसविलेल्या कॅमेर्‍यात रस्त्याने जाणार्‍या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. मग तो दुचाकीवर असो किंवा चार चाकीवर तसेच वाहनाची नंबरप्लेट देखील स्पष्ट दिसत होती, हे चित्रण पाहुन पीआय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गावातील सर्व पतसंस्था बँंका व्यापारी शाळा कॉलेज या सर्वांनी आपल्या व गावाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवावे असे आवाहनही देशमुख यांनी केले. यावेळी पीएसआय दिपक मेढे उपसरपंच मुस्ताक शेख प्रफुल्ल डावरे ऐएसआय सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी आदी उपस्थित होते

COMMENTS