Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात जात पडताळणी प्रस्ताव स्वीकृती व प्रमाणपत्राचे वाटप

अंबाजोगाई प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत जात पडताळणी समिती बीड अंतर्गत 26 जून ते 26 जुलै या कालावधीत मंडणगड पॅटर्न अंतर्ग

मोठी दुर्घटना ! 30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली .
काॅम्रेड आणि संविधान!
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार : नवाब मलिक

अंबाजोगाई प्रतिनिधी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत जात पडताळणी समिती बीड अंतर्गत 26 जून ते 26 जुलै या कालावधीत मंडणगड पॅटर्न अंतर्गत राजश्री शाहू महाराज जयंती पर्व निमित्त बीड जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप व प्रस्ताव स्वीकृतीची विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमअंतर्गत आज दिनांक 12/07/2023  वार बुधवार रोजी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात  जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप व प्रस्ताव स्वीकारणे या संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करून जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. साखरे उपस्थित होते. तर जात पडताळणी समिती बीड कार्यालयाचे  संशोधन सहाय्यक श्री. सुशीलकुमार काळे सर, बार्टी चे समतादूत व्यंकटेश जोशी व वर्षा देशमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी  समानसंधी  केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र आचार्य सर, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख एन.एस. धायगुडे विचार मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  11 वी 12 वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS