कोपरगाव शहर : कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे डायल 112 मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी 4.18 वाजता कॉल आला व त्यावर हनुमाननगर गेट कोपरगांव या ठिकाणी भावाचा क
कोपरगाव शहर : कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे डायल 112 मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी 4.18 वाजता कॉल आला व त्यावर हनुमाननगर गेट कोपरगांव या ठिकाणी भावाचा काल खून झाला असून, त्याचा मृतदेह सापडत नाही तरी तात्काळ पोलिस मदत पाठवा असा कॉलरने कॉल केल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक भगवान मधुरे यांनी तात्काळ सपोनि आशिष शेळके, पो. कॉ चोंगडे, पो. कॉ साळुंखे यांना सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी रवाना केले. त्यांनी सदर ठिकाणी जावुन कॉलरचे मोबाईल नंबरवर संपर्क केला असता कॉलर याने पोलीसांना काही एक प्रतिसाद दिला नाही.
तेव्हा पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिकांकडे विचारपूस केली असता सदर ठिकाणी कोणताही खून झालेला नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कॉलरच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क करून त्याची भेट घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव परशराम रावसाहेब दिवे राहणार हनुमाननगर अस सांगितले. त्यावेळी त्याचेकडे घटनेबाबत सविस्तर विचारपुस केली असता कॉलरने सांगितले की, त्याचा मोठा सावत्र भाऊ संतोष आढांगळे याचा पहाटे 3 वा. खून झालेला आहे आणि त्याचा मृतदेह हा तेथेच राहणारा माउ पवार याने गोणीत घालुन घेवुन जातांना मी पाहिले आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कॉलरची पत्नी रत्नमाला परशुराम दिवे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी कॉलरचा सावत्र भाउ संतोष आढांगळे यांचा मोबाईल नंबर घेत त्यावर संपर्क केला असता त्याने सांगितले की, मी जिवंत असून सुस्थितीत आहे. त्यामुळे पोलिसांची खात्री झाली की, कॉलर परशराम रावसाहेब दिवे याने कोणतीही खुनासारखी घटना घडलेली नसतांना पोलिसांना त्रास व्हावा या खोडसाळ वृत्तीने डायल 112 यावर कॉल करुन खोटी माहिती दिली. म्हणूून आरोपी परशराम रावसाहेब दिवे याचे विरूध्द कोपरगांव शहर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 212 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि भगवान मधुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों बबन तमनर हे करीत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हणून डायल 112 सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तरी तक्रार सत्य व खरी असल्याशिवाय डायल 112 हा नंबर डायल करू नये. तसेच डायल 112 वर खोटी माहिती देवु नये. खोटी माहिती देणार्या विरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. भगवान मथुरे, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक
COMMENTS