Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपहरणप्रकरणी आमदार सुर्वेसह 15 जणांवर गुन्हा

बंदुकीच्या धाकावर मुंबईतील व्यावसायिकाचे अपहरण

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गोत्यात आले असून, त्यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल झाल्य

आपत्तीत मदत करणारे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ः प्रा. बारहाते
जमिनीच्या वादातून तलवारीने तोडले हात पाय| LOKNews24
जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगतचा रस्ता खुला करा ः स्नेहलता कोल्हे

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गोत्यात आले असून, त्यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील या व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी मुंबईतील गोरेगाव इथल्या ग्लोबल म्युझिक जंक्शन येथे घडली असून, त्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्यावसायिकाला सर्वांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेत मारहाण केली. तसेच त्याला शिवीगाळ करत कुठल्या तरी कागदावर जबरदस्तीने सह्या देखील घेतल्या. या प्रकरणी मुंबईतील वनराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि इतर 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिंह यांनी मनोज मिश्रा याच्याबरोबर व्यवसायाबाबत वर्षाच्या करारनामा केला. मात्र, मनोज मिश्राने पैसे परत न करता हा करारनामा जबरदस्तीने रद्द करण्याकरता सिंह यांच्यावर दबाव घातला. मात्र, यासाठी ते तयार नसल्याने त्यांनी सिंह यांच्या कार्यालयात जात त्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर बंदुकीच्या धाक दाखवून त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवत अपहरण केले. त्यांना प्रकाश सुर्वे यांच्या मुंबईतील कार्यालयात नेले. तसेच त्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्पवर मनोज मिश्रा याच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. राजकुमारचे वकील सदानंद शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक आणि आरोपी मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी साडेआठ कोटी रुपये दिले होते. मात्र, त्याने हे पैसे लुबाडले. तसेच हा करारनामा मोडण्यासाठी सिंह यांच्यावर दबाव टाकला जात होता. या प्रकरणी पीडित राजकुमार सिंहच्या वतीने वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह इतर जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS