Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यंगचित्र हा मानवी मनाचा आरसा – अरविंद गाडेकर

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय संगमनेर बहि:शाल शिक्षण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण

’इरसाल नमुने’ विनोदी पुस्तक वाचकप्रिय होईल ः डॉ. सुधीर तांबे
पाणी प्रश्न सोडविणारच, नगरपालिकेची सत्ता द्या : विकास करून दाखवतो – आ. आशुतोष काळे
श्रीगोंद्यात नवीन फौजदारी कायदेविषयी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय संगमनेर बहि:शाल शिक्षण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘ व्यंगचित्र जीवन जगण्याची कला” या विषयावर बोलताना संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि बहि:शाल व्याख्याते अरविंद गाडेकर म्हणाले, ” कधी हास्य तर कधी गंभीरता धारण केलेले व्यंगचित्र समाज जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे.  जीवानात एक तरी कला अवगत असणे खूप गरजेचे झाले आहे. मग ती कला, चित्रकला, व्यंगचित्रकला , नृत्य , संगीत , नाटक, खेळ इ० या कला तुम्ही का जगायचे हे सांगतात. व्यंगचित्र ही अशी कला आहे जी तुम्हाला तुम्ही नकारात्मक विचार मनात बाळगून असता त्यावर मात करायला शिकवते . सकारात्मक उर्जा मिळविण्याचे साधन अनेक आहेत पण हास्य तुम्हाला सकारात्मक उर्जा देते. टीव्ही नकारात्मक आणि भीतीदायक बातम्या देतात, मोबाईल अभाषी जग आहे आणि त्यातून नकारात्मक उर्जा मिळते, मिळणारा आनंद क्षणिक असतो परंतु पुस्तक वाचन, तुम्ही जोपासलेली कला तुम्हाला सकारात्मक उर्जा देवून तुमचे व्यक्तिमत्व खुलवतात.”
            एक आगळेवेगळे व्याख्यान, प्रभावी आणि प्रबोधन करणारी व्यंगचित्रे यातून अरविंद गाडेकर यांनी हसवता हसवता सभोवतालच्या जीवनातील विसंगती टिपून त्यावर भाष्य करत संदेश देणारी व्यंगचित्र सादर केली त्यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
            यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पदवीधर मतदार संघाचे मा. आ. डॉ.सुधीर तांबे , कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅक समन्वयक प्रा. धायवट , या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र -कार्यवाह प्रा.स्वाती ठुबे हे होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.सीमा मोरे , प्रा.डॉ. अनुपमा कांदळगावकर , प्रा. मंजुषा जोंधळे  यांनी परिश्रम घेतले. यावेळी या महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

COMMENTS