Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाकाबंदी दरम्यान पीएसआयच्या अंगावर घातली गाडी

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा तर कुठे वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र शनिवारी

चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
अक्षदा मंगल कलशाचे राजूरमध्ये स्वागत
कराड-पाटण मार्गावर ओमनी-दुचाकी धडकेत तिघे गंभीर

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा तर कुठे वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र शनिवारी कांजूरमार्ग परिसरात नाकाबंदीसाठी उभे असलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्थात एका पीएसआयच्या अंगावर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अपघातानंतर पोलीस उपनिरीक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी चालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र खवळे असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ते पार्कसाईट पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. खवळे व त्यांचे पथक कांजूरमार्ग येथील हुमा मॉल परिसरात नाकाबंदीच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी एक पांढर्‍या रंगाची मोटरगाडी तेथे आली. पोलिसांनी चालकाला मोटारगाडी थांबवण्याचा इशारा दिला. त्यावेळी त्याने मोटरगाडी न थांबवता तिचा वेग वाढवला. चालकाने खवळे यांच्या अंगावर मोटारगाडी घातली व तो गांधी जंक्शनच्या दिशेने पळून गेला. या अपघातानंतर खवळे खाली कोसळले. त्यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे पोलीस नियत्रंण कक्षाला घटनेबाबतची माहिती देऊन आरोपी चालकाला पकडण्यासाठी मदत मागण्यात आली. बिट मार्शलही दुचाकीवरून मोटारगाडीचा पाठलाग करत होते. आरोपीने मोटारगाडी गांधी नगर येथून बिंदू माधव चौक, कांजूरमार्ग पूर्व, नाहूर पूर्व मार्गे भांडूपला नेली. एकता चौक येथे भांडूप पोलिसांनी चालकाची मोटारगाडी अडवली. चालकाचे नाव विशाल घोरपडे (वय 34) असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पार्कसाईट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने जाणूनबुजून भरधाव वेगाने मोटारगाडी चालवून उपनिरीक्षक खवळे यांच्या अंगावर घातली. त्यामुळे त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करणे व सरकारी अधिकार्‍याला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्कसाईट पोलिस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS