Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपचारानंतर कॅन्सरग्रस्त रुग्णही चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले

कराड : कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांच्या बैठकीत बोलताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. डावीकडून डॉ. रश्मी गुडूर, डॉ. आनंद गुडूर, डॉ. ए. वाय. क्षीरसाग

आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला
बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप

कराड / प्रतिनिधी : कॅन्सरचे योग्यवेळी निदान झाल्यावर उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो. तो पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो हा आत्मविश्‍वासास सर्व रूग्णांनी बाळगावा, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा विद्यापीठात कृष्णा कॅन्सर इन्स्टिट्यूट व ऑन्कॉलॉजिक फिजिओथेरपी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर यशस्वी उपचार घेतलेल्या रुग्णांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी आणि त्यांना भविष्यकालीन मार्गदर्शन करण्यासाठी कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांच्या नियमित बैठकीचे आयोजन केले जाते.
डॉ. भोसले म्हणाले, अलीकडच्या काळात लोकांमध्ये कर्करोगाबद्दल जागृती निर्माण होऊ लागली आहे. वेळीच निदान व योग्य उपचार झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन रूग्णांनी न घाबरता उपचारास प्राधान्य द्यावे. आपण पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो हा आत्मविश्‍वास रूग्णांनी बाळगावा. रुग्णांनी नियमित तपासणी तसेच पुरेशी काळजी घ्यावी.
याप्रसंगी रुग्णांना व्यायाम साहित्य, औषधे तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे वितरण करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कॅन्सर विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार प्रदर्शन डॉ. तृप्ती यादव यांनी केले.

COMMENTS