ओमायक्रॉनमुळे भारतावर येऊ शकते आर्थिक संकट ?

Homeताज्या बातम्यादेश

ओमायक्रॉनमुळे भारतावर येऊ शकते आर्थिक संकट ?

संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने व्यक्त केली भीती

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतात पुन्हा एकदा कोरोना उद्रेक झाला असून, गुरूवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने अडीच लाखाचा आकडा ओलांडला आहे. त्यातच ओमायक्रॉनचे

प्रेयसीसाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार.
प्रशासकांच्या नाकर्तेपणामुळे नगर अर्बन बँकेवर निर्बंध
दोन गटात हाणामारी आणि तोडफोड झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद | LOKNews24

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतात पुन्हा एकदा कोरोना उद्रेक झाला असून, गुरूवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने अडीच लाखाचा आकडा ओलांडला आहे. त्यातच ओमायक्रॉनचे रुग्ण मोठया संख्येने वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असतांनाच, ओमायक्रॉनमुळे भारतावर आर्थिक संकट येऊ शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने व्यक्त केली आहे.
भारतात जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवडयात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सुरूवात झाली असून, कोरोना रुग्ण संख्य संख्या काल 2 लाख 64 हजारांवर पोहचली आहे. जर रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर कठोन निर्बंध लादावे लागणार आहे. आणि ते भारतीय अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने देखील भीती व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून भारतात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत पहिल्या वर्षी देशाला या विषाणूमुळे मोठा फटका बसला. लाखो जीव गमवावे लागले. मात्र, त्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली. मात्र, पहिली लाट ओसरल्यानंतर देशाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काहीसे यश मिळते न मिळते, तोच पुन्हा डेल्टा व्हेरिएंटनं अर्थव्यवस्थेवर हल्ला केला. आता पुन्हा एकदा ओमायक्रॉनमुळे तेच संकट भारतावर येऊ शकतं, अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.पहिल्या लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरिएंटमुळे अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचे चित्र निर्माण झालेलं असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि तिसर्‍या लाटेचं संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने यासंदर्भात भारताला इशारा दिला आहे. येत्या काळात भारतावर पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचे आर्थिक संकट येऊ शकतं, असे या समितीने नमूद केले आहे. निर्यातीमधील वृद्धी आणि वाढलेल्या गुंतवणुकीमुळे काहीसा फायदा नक्कीच होईल. पण कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि कोळशाची टंचाई येत्या काही काळात अर्थव्यवस्थेची गती मंदावू शकतात. त्यामुळे सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक ठरणार आहे, असे या समितीने नमूद केले आहे.

भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा वेग चांगला
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला तरी, देखील भारतीय अर्थव्यवस्थेने लवकरच यातून बाहेर येत अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली. भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा वेग चांगला असल्याचं देखील संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने नमूद केले आहे. वेगाने होणारे लसीकरण, सौम्य निर्बंध आणि त्याला अनुसरून अर्थविषयक धोरण यामुळे भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढू शकतो, असे यात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS