Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरवसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहमदनगर ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा राज्यस्तरीय अहिल्य

महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात
कोपरगाव मतदारसंघात उद्या 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
तक्रारदाराकडील पुराव्यामुळे आरोपीचा अटकपूर्व फेटाळला

अहमदनगर ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरवाने सन्मानित केले जाणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक, अध्यात्मिक, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा जयंती सोहळ्याचा कार्यक्रम सावेडी येथील माऊली सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध निसर्गोपचार तंज्ञ संजीवनी स्वागत खेडकर यांचे महिला आरोग्य, निसर्गोपचाराद्वारे विविध उपचार पद्धती या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट महिलांना सौंदर्य खुलविण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट तथा अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कावेरी कैदके व सुवर्णा कैदके यांनी दिली. अनेक मान्यवरांच्या हस्ते महिलांचा गौरव केला जाणार असून, 20 मे पर्यंत आपले प्रस्ताव अहिल्या मेकओव्हर, एकविरा चौक, पाईपलाईन रोड या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी 9921712312 क्रमांकवर संपर्क साधण्याचे म्हटले आहे.

COMMENTS