Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायती अंतर्गत 14 रिक्त जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

लोहा प्रतिनिधी - ग्रामपंचयतीच्या गत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य तसेच सरपंच पदांच्या कांहीं जागा विविध कारणांनी रिक्त झाल्याने ग्राम

पाणी हक्क संघर्ष समितीचा रास्ता रोको
कार्तिकी यात्रे निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३५ फेऱ्या
ओपन’ साठी २० तर ‘ट्रायबल’ साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा

लोहा प्रतिनिधी – ग्रामपंचयतीच्या गत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य तसेच सरपंच पदांच्या कांहीं जागा विविध कारणांनी रिक्त झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांच्या तसेच सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामध्ये लोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 14 रिक्त जागांचा समावेश आहे. सदरील पोटनिवडणूकीची सूचना लोहा तहसिलदार यांनी दि. 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली असून दि. 24 एप्रिल पासून रिक्त जागांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ होणार आहे.
राज्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका गत कालावधीत पार पडल्या होत्या. सदरील निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच पदांच्या जागा राजीनामा, निधन, अपात्र, अनाहता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झाल्या होत्या. त्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये लोहा तालुक्यातील आंडगा ग्राम पंचायत नामाप्र (स्त्री) 1 जागा, धनज (बु) – अनुसूचित जाती 1 जागा, गुंडेवाडी – नामाप्र 1, जानापुरी – अनुसूचित जमाती 1, खांबेगाव – नामाप्र (स्त्री) 1, सर्वसाधारण (स्त्री) 1, पिंपळदरी – अनुसूचित जाती 1, नामाप्र 1, रामतीर्थ – नामाप्र 1, शेवडी (बा) – सर्वसाधारण (स्त्री) 1, वडेपुरी – सर्वसाधारण 1, घुगेवाडी – अनुसूचित जाती 1, नगारवाडी – अनुसूचित जमाती 1, पळशी – अनुसूचित जाती 1 आदी बारा ग्रामपंचायतीतील चौदा रिक्त जागांचा समावेश आहे. लोह्याचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी सदर पोटनिवडणुकीची सूचना दि. 18 रोजी मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार दि. 24 एप्रिल मंगळवार ते दि. 2 मे मंगळवार या कालावधी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत नामनिर्देशनपत्र मागविणे अर्थात दाखल करता येणार आहे. दि. 3 मे रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता पासून नामनिर्देशन पात्रांची छाननी प्रक्रिया होणार आहे. दि. 8 मे रोजी सोमवारी दुपारी 3 वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. दुपारी 3 वाजे नंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 18 रोजी गुरुवारी सकाळी 7:30 पासून सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दि. 19 मे रोजी शुक्रवारी निवडणुकीची मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.

COMMENTS