Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केबल जळाल्याने. वीजपुरवठा खंडित. संबंधिताच्या दुर्लक्षाने शेतकर्‍यांची पिके करपली

मुदखेड प्रतिनिधी - मुदखेड तालुक्यातील  मौजे राजवाडी येथील मागील चार ते पाच दिवसापासुन थ्री फेज लाईट केबल जळाल्यामुळे बंद आहे.त्यामुळे गावातील प

जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?
बोगस बियाणांचा सुळसुळाट
लातूरमधील आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

मुदखेड प्रतिनिधी – मुदखेड तालुक्यातील  मौजे राजवाडी येथील मागील चार ते पाच दिवसापासुन थ्री फेज लाईट केबल जळाल्यामुळे बंद आहे.त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असून. शेतकर्‍यांचे जवारी केळी पिके उभे करपून जात आहेत. शेतक-यांना थ्री फेज लाईट नसल्याने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे जबाबदार असा सवाल शेतकर्‍यातून केला जात आहे.होत . शेतातील उभे पिक उन्हाळा असल्याने जागेवर वाळुन जात आहे. मागील अनेक महिण्यापासुन राजवाडी भागातील लाईट हि सुरळीत नाही तसेच याअगोदर सुध्दा आपल्या कार्यालयाकडे नुकसान भरपाई बदल माहिती दिली होती.
 मागील चार ते पाच दिवसापासुन थ्री फेज  नसल्याने होणारे नुकसान सहन करणे शक्य नसल्याने आपल्या कार्यालयामार्फत त्वरीत थ्री फेज विज जोडणी करुन सहकार्य करावे. अशी मागणी करणारे निवेदन संबंधित राजवाडे येथील सरपंच व गावकर्‍यांनी वितरण विभागाच्या व्यवस्थापकास दिले आहे. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास  आपल्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. दि 3 मार्च रोजी 2023  बसण्यात येणार असल्याचे निवेदन दि.31 मार्च रोजी  महावितरण कार्यालय येथे देण्यात आले. याबाबत संबंधित असे विचारणा केली असता रेल्वे पटरी खालून जळाले आहे नवीन केबल साठी परवानगी घ्यावी लागते परवानगी मिळाली असून आज केबल टाकून पाच वाजेपर्यंत ल विज.सुरळीत होईल अशी माहिती दिली .यावेळी  राजवाडी येथील सरपंच प्रतिनिधी आनंदराव गुंजकर, शेतकरी देवानंद साईनाथ महादवाड, डॉ.साहेबराव राजवाडीकर, जयराम वने, नितीन जोंधळे, सुधाकर चव्हाण, उत्तम हौसरे, प्रकाश चव्हाण, सुनील शेट्टे, साहेबराव जोंधळे, शिवाजी वने, ओमकार महादवाड, अविनाश सावामाचल, विनोद चव्हाण यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS