Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

स्वस्तात खरेदी करा नोकियाचा ‘हा’ नवा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नोकिया कंपनीच्या मोबाईला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह मोबाईल मार्केटमध्ये आणत असते.

गुरुकुल स्कूल ठरली संपूर्ण लसीकरण करणारी सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
काळुंद्रे-खराळे-चिंचेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी संपादीत जमिनींचा मोबदला कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

नोकिया कंपनीच्या मोबाईला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह मोबाईल मार्केटमध्ये आणत असते. नुकताच नोकिया कंपनीने Nokia 105 4G ची नवीन व्हर्जन लॉन्च केला. हा फोन बॅटरी आणि इतर फीचर्समध्ये बदल करून लॉन्च करण्यात आला आहे. यावरुन असा अंदाज लावता येऊ शकतो की, जुन्या Nokia 105 4G च्या तुलनेत नवीन फोनमध्ये अनेक अपग्रेड्स पाहायला मिळणार आहेत.

Nokia 105 4G (2023) किंमत – नोकिया कंपनीने क्लासिक कँडी बार डिडाइनवाला Nokia 105 4G (2023) हा मोबाईल फोन 25 एप्रिलला लाँच केला. हा मोबाईल फोन नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत 229 युआन म्हणजे 2,715 रुपये ऐवढी आहे. पण हा फोन 199 युआन म्हणजेच 2,359 रुपयांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची विक्री 28 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

Nokia 105 4G (2023) चे स्पेसिफिकेशन – या नवीन Nokia 105 4G (2023) फोनमध्ये 42 टक्के मोठी 1450mah बॅटरी मिळत आहे. फोनमध्ये 32GB इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय नोकियाचा हा फोन ब्लूटूथ 5.0 सह येतो. फोन Migu music आणि Himalaya फंक्शनला सपोर्ट करतो. त्यात आता होल्ड बटन फॉन्ट उपलब्ध आहे. नोकियाचा हा फीचर फोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.

हा नवीन फोन क्लासिक कँडी बार डिझाइनसह येतो. यात फिजिकल बटणे आहेत. Nokia 105 4G फोन ड्युअल कार्ड, ड्युअल-स्टँडबाय आणि ड्युअल 4G फुल नेटकॉम सपोर्टसह येतो. यात ड्युअल नॅनो सिम-कार्ड स्लॉट देण्यात आले आहेत. याशिवाय फोनमध्ये UNISOC T107 चिप देण्यात आली आहे.

COMMENTS