मुंबई प्रतिनिधी - प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मिळत असलेल्या धमक्या थांबलेल्या नाहीत. आता तिसऱ्य
मुंबई प्रतिनिधी – प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मिळत असलेल्या धमक्या थांबलेल्या नाहीत. आता तिसऱ्यांदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे तब्बल 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या आधी ज्या दोन धमक्या मिळाल्या होत्या त्यात पहिल्यांदा 20 कोटी आणि नंतर 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागील ई मेलला प्रतिसाद दिला नाही म्हणून रक्कम 200 कोटींवरून 400 कोटी करण्यात आल्याचे आरोपीने म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला गती देण्यात आली आहे. या प्रकाराने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.
या धमकी देणाऱ्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल केले आहेत. पोलीस माझा शोध घेऊ शकत नाहीत. ते मला अटक करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जीवे मारण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. मग तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही. आमचा एक शूटर आहे जो तुम्हाला मारू शकतो असे धमकीच्या ई मेलमध्ये म्हटले आहे. याआधीही अंबानी यांना दोन वेळेस धमकी देण्यात आली होती. दुसऱ्यांदा जी धमकी मिळाली त्यात दोनशे् कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करत तपास सुरू केला. मात्र, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करणे याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
COMMENTS