व्हिडिओ तयार करून व्यावसायिकाची आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिडिओ तयार करून व्यावसायिकाची आत्महत्या

प्रल्हाद पाटील असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव

कल्याण प्रतिनिधी  - डोंबिवली संदप गावात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना दिवा पनवेल मार्गावली दातिवली आणि निळजे रेल्वे स्थानकादरम

लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
मुंबईत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीने केली आत्महत्या
नवी मुंबईत दोन शाळकरी मुलांची आत्महत्या

कल्याण प्रतिनिधी  – डोंबिवली संदप गावात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना दिवा पनवेल मार्गावली दातिवली आणि निळजे रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी प्रल्हाद पाटील या व्यावसायिकाने व्हीडीओ तयार केला आणि सूसाईड नोट लिहल्याच देखील समोर आलं आहे. केबल व्यावसायात प्रतिस्पर्ध्याकडून  होत असलेल्या छळाला कंटाळून पाटील यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप पाटील यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. या प्रकरणी ठाणे जीआरपीने आत्महत्येस प्रवृत्त  करणाऱ्या पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान या मधील एक आरोपी हा भाजपचा पदाधिकारी असून त्याच्या विरोधात याआधी देखील डोंबिवली मधील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

COMMENTS