पाथर्डी/प्रतिनिधी ः बसचा प्रवास सुखकर मानला जातो.परंतु पाथर्डी आगारातील बसचा प्रवास हा धोकादायक बनला आहे. पाथर्डीवरून नगरकडे प्रवास करताना बर्या

पाथर्डी/प्रतिनिधी ः बसचा प्रवास सुखकर मानला जातो.परंतु पाथर्डी आगारातील बसचा प्रवास हा धोकादायक बनला आहे. पाथर्डीवरून नगरकडे प्रवास करताना बर्याच वेळा बस बंद मध्येच बंद पडते. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून एखाद्या निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर याला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी पाथर्डी तालुक्यातील प्रवाशांच्या होणार्या गैरसोयीच्या निषेधार्थ आगार बंद आंदोलन केले त्यावेळी भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे बोलत होते.
यावेळी मुकुंद गर्जे, मुकूंद आंधळे, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, संदीप फुंदे, परवेज मणियार सचिन नागपुरे, उबेद आतार आदींजणासह नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना अमोल गर्जे यांनी म्हटले की, अधिकार्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आगारातील बसेस वेळेवर सूटत नाही.स्वच्छता नाही,पाणी पिण्याची व्यवस्था नाही.अशी बिकट परिस्थिती पाथर्डी आगाराची आहे. आम्ही जरी सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. प्रवाशांच्या भावना मांडण्यासाठी हे गेट बंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला अनेक संघटनानी पाठींबा दिला आहे.आगारात काम करणारे चालक हे अधिकार्यांना बसच्या दूरवस्थेबद्दल माहिती देऊनही त्यांना बस बळजबरीने चालवावी लागत आहे. मुकुंद गर्जे यांनी आगारातील अधिकार्यांशी बोलताना म्हटले की, लांब पल्ल्याच्या गाड्या मधेच बंद पडत आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत.मंजूर झालेल्या बसेस कोणत्या अधिकारात मागे पाठवल्या तुम्हाला कोणाचे पत्र आले ते सर्व लिखित स्वरूपात द्या. आगारातील 90 टक्के बस खराब आहेत.चालक वाहकाला बळजबरीने तुम्हाला काम द्यावे लागत असून तुमच्या वर्कशॉपला साधन सामग्री नाही. एस.टी. महामंडळाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.
COMMENTS