Homeताज्या बातम्याविदेश

नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू

नेपाळ प्रतिनिधी - नेपाळमध्ये बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून हा अपघात झाला. नेपाळच्या मधे

मायलेकीचा प्रवास अखेरचा ठरला; हायवेवर आयशर टेम्पो-कंटनेरला भीषण अपघात
अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू
चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

नेपाळ प्रतिनिधी – नेपाळमध्ये बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून हा अपघात झाला. नेपाळच्या मधेश प्रांतात ही घटना घडली. या अपघातामध्ये सहा भारतीयांसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळली. मधेश प्रांतात डोंगराळ भागातून जाणारी ही बस 50 मीटर खोल दरीत असलेल्या नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये सहा भारतीय भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये १९ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे मधेश प्रांतातील बारा जिल्ह्यात हा अपघात झाला. राजस्थानवरुन भाविकांना ही बस घेऊन जात होती. ही बस दरीमध्ये कोसळून चुरियामाई मंदिराच्या दक्षिणेला नदीच्या काठावर पडली. रस्त्यापासून सुमारे 50 मीटर खाली ही बस कोसळली. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यां मध्ये सहा भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक प्रदीप बहादूर छेत्री यांनी सांगितले की, भाविकांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन रस्त्यावरुन नदीत पडली. बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. मृतांमध्ये सहा भारतीय आणि एका नेपाळी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी बस चालक जिलामी खानसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या अपघातात चालक आणि सहकाऱ्यांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारानंतर ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS