Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यात सातारा आगाराची बस जळून खाक

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धुळदेव येथे बर्निंग एसटीचा थरार चालकाच्या प्रसंगावधाने 44 प्रवाशी असलेल्या बसमधील कोणतीही जीवित हानी झाली नाह

शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
एसटी आंदोलनात ठिणगी; इस्लामपूर डेपोतून वाटेगावला निघालेली एसटी बस अज्ञातांनी फोडली
खूनातील संशयिताचा सांगली जिल्हा रुग्णालयात धिंगाणा

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धुळदेव येथे बर्निंग एसटीचा थरार चालकाच्या प्रसंगावधाने 44 प्रवाशी असलेल्या बसमधील कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा आगाराची (एमएच 11 बीएल 9355) बस सोलापूरला जात असताना म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावरील धुळदेव येथे एक वयस्कर प्रवाशी उतरण्यासाठी थांबवली होती. धुळदेव बसस्थानकाजवळ गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक शंकर पवार त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून बसचे वाहक सुधीर जाधव यांना बसमधील 44 प्रवाशांना खाली उतरवून घेण्यास सांगितले. प्रवाशांना तात्काळ खाली उतरवल्यानंतर पाच-दहा मिनिटात आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेमध्ये संपूर्ण बसने पेट घेतला.
या घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांना समजताच ते पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे गाडी बोलावून बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याकामी नगरपालिकेचे कर्मचारी प्रकाश पिसे व नवनाथ वलेकर यांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम केले.
बस चालक शंकर पवार व चालक सुधीर जाधव यांच्या प्रसंगावधानाने आज 44 प्रवाशांच्या जीव वाचवला आहे. आमच्यावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती आमचे दैवत बलवत्तर होते म्हणून आम्ही बचावलो, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली. घटनेचा पुढील तपास सपोनि बाजीराव ढेकळे करत आहेत.

COMMENTS