Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रंधा धबधबा परिसरात घरफोडी

23 हजारांचे दागिने लंपास

अकोले ः घरामध्ये कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी 23 हजारांच्या दागिन्याची मध्यरात्री घरफोडी करून चोरी केली. येथील रंधा धबधबा परिसरात

मढी देवस्थानचा पैसा आणि मालमत्तेच्या गैरवापराला विरोध केल्यानेच मला मारण्याचा कट ः संजय मरकड
कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे
शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा परीक्षा कामांवर बहिष्कार

अकोले ः घरामध्ये कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी 23 हजारांच्या दागिन्याची मध्यरात्री घरफोडी करून चोरी केली. येथील रंधा धबधबा परिसरात नुकतीच ही घटना घडली. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. संबधीत चोरांनी भंडारदरा परिसरातही अनेक ठिकाणी रिकामे घर बघून कुलपे तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचेनिदर्शनास आले आहे. त्यावेळी भंडारदरा गावामध्ये सदर चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्यात चार चोरटे दिसत असून अंगामध्ये रेनकोट परिधान केल्याचे आढळुन आले आहे. अकोले तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणार्‍या राजूर येथे शुक्रवारी मध्यरात्री सर्वोदय कॉलनीत चोरट्यांनी चार ठिकाणी घरे फोडली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा एकदा चोरट्यांनी रंधा धबधबा येथे लहू मंगळा पटेकर या निवृत्त शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडत दागिन्यांची चोरी केली. पटेकर हे नाशिक येथे आपल्या दोन्ही मुलांकडे गेले होते. नाशिक येथून परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलपे तोडलेली दिसून आले. चोरट्यांनी घरामधील सर्व सामानाची उचकापाचक केली होती. तसेच भुईमुगाच्या शेंगाचे पोतेही जमिनीवर ओतले. कपाटामध्ये असलेली सोन्याची नथ, चांदीचे बाजूबंद, कानातले वेल, टॉप्स व सोन्याचे मनी, असा एकूण 23 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत लहू मंगळा पटेकर यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, सचिन शिंदे व इतर कर्मचारी करीत आहेत.

COMMENTS