Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जामखेडमध्ये घरफोडी – लाखोंचा ऐवज लंपास

जामखेड प्रतिनिधी - शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी चोरांचा सुळसुळाट चालू आहे. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी चोर्‍या व घरफोड्या होत आहे.त्यामुळे नाग

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेले मोडी अप्रकाशित पत्र उजेडात
बेलापूर-खंडाळा-अस्तगाव या रस्त्यांना निधी मंजूर करणार
गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे

जामखेड प्रतिनिधी – शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी चोरांचा सुळसुळाट चालू आहे. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी चोर्‍या व घरफोड्या होत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झालेले आहे. जामखेड शहरातील गूगळे नर्सरी समोरील भागात एका शिक्षिकेच्या घरी घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सर्वत्र सामानाची उचकापचक करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार , शिक्षिका आशा किसन उदावंत (वय 40)   रा-सोनेगाव ता.जामखेड हल्ली रा.गुगळे नर्सरी समोर यांनी फिर्यादित म्हटले आहे की, मी संत कैकाडी महाजन विद्यालय सोनेगाव येथे शिक्षिका असून आई सोबत सोनेगाव येथे भाड्याच्या घरात राहते. जामखेड येथील घराला कुलूप लावले होते. दि.15 आँगस्ट रोजी शाळेला सुट्टी असल्याने जामखेड येथील घरी राहणेसाठी आलेे असता,त्यावेळी माझे गळ्यातील गंठण, हातातील अंगठ्या, नाकातील मोरणी, व रोख रक्कम पर्समध्ये ठेवुन ती पर्स घरातील लाकडी शोकेसमध्ये ठेवून कदली होती. मी अहमदनगरला बहिणीकडे जाऊन परत संध्याकाळी सोनेगाव येथे गेले होते. दि.19 रोजी सांय 5 वाजेच्या सुमारास मी सोनेगावहुन जामखेड येथील घरी आले. तेव्हा घरातील पाठीमागील गेटची जाळी तुटलेली दिसली. गेट सताड उघडे दिसले व रुमचा दरवाजाही उघडाच दिसला. घरातील सर्व वस्तु इकडे तिकडे पडलेल्या दिसल्या. घरात ठेवलेले सर्व दागदागिने, वस्तू आढळून आले नाही. तेव्हा खात्री झाली की, घरात चोरी झाली आहे.चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 25 हजार रूपये किमतीचे सोन्याचे मनी व सोन्याचे डोरले, गंठण,25 हजार रुपये किमतीचे 3 सोन्याचे खड़े असलेल्या 3अंगठ्या, तसेच 2 हजाराची नाकातील मोरनी तसेच 90 हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. आशा कीसन उदावंत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणांचा पूढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील बढे करत आहेत.

COMMENTS