Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवभोजन चालकांची दादागिरी; टार्गेट पूर्ण करण्यासाठी रस्त्याहून जाणार्‍यांना दमदाटी !

शिव भोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना अडवत शिवभोजन चालक त्यांचे फोटो काढू लागले

बीड प्रतिनिधी - राज्य शासनाकडून गरजूंना अल्पदरामध्ये जेवण मिळावे यासाठी राज्यांमध्ये शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे. परंतु या शिवभोजन योजनेचा

गोधेगाव शाळेतील माजी विद्यार्थी 18 वर्षांनी आले एकत्र
सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग
महिला वाहतूक पोलिसासोबत युवकाचे उद्धट वर्तन | LOKNews24

बीड प्रतिनिधी – राज्य शासनाकडून गरजूंना अल्पदरामध्ये जेवण मिळावे यासाठी राज्यांमध्ये शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे. परंतु या शिवभोजन योजनेचा गैरवापर काही शिवभोजन चालक करत आहेत. बीड शहरातील काही शिवभोजन चालक चक्क रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांना दमदाटी करत त्यांना बळजबरीने हॉटेलमध्ये नेऊन शिवभोजन थाळी समोर बसून फोटो काढण्याचे प्रकार  करत आहैत. यामुळे हि योजना नेमकी कोणाच्या फायद्याची आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वसामान्यांसाठी शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या मार्गाने होत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी या योजना बोगसपणे राबवण्यात येतात. अशीच योजना म्हणजे  शिव भोजन योजना फक्त दहा रुपयांमध्ये गरजूंना पोटभर जेवण मिळावे यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा बीडमध्ये मात्र गैरमार्गाने वापर होत आहे. शिवभोजनचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी चक्क रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांना दमदाटी करत त्यांचे फोटो घेण्याचे प्रकार शहरातील काही शिवभोजन चालकाकडून होत आहेत. यामुळे या प्रकाराला कोण आळा घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

COMMENTS