घरात मल्ल व दारात वळू !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

घरात मल्ल व दारात वळू !

महाराष्ट्राच्या मातीत अभिमानाने घरात मल्ल आणि दारात वळू असावा असे बिरूद मिरवले जायचे. त्यामागे एक प्रतिष्ठा आणि पंरपरा होती. मात्र शेतकर्‍याचा बैल न्

हिट अँड रनच्या वाढत्या घटना चिंताजनक
डोक्यातला बर्ड फ्लू
भारतच खर्‍या अर्थाने विश्‍वविजेता

महाराष्ट्राच्या मातीत अभिमानाने घरात मल्ल आणि दारात वळू असावा असे बिरूद मिरवले जायचे. त्यामागे एक प्रतिष्ठा आणि पंरपरा होती. मात्र शेतकर्‍याचा बैल न्यायालयीन व क्लिष्ट कायदे प्रक्रियेत अडकल्याने, शेतकर्‍यांच्या आयुष्यातील बैल व बैलांच्या शर्यतीना असलेले सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व वादात अडकले आहे. बैलगाडा शर्यती ची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षाची परंपरा आहे. देशपातळीवर पंजाब मध्ये किल्ला रायपूर येथेही प्राचीन काळापासून मिनी ऑलंपिक म्हणून बैलांच्या शर्यती बाबतचे उल्लेख सापडतात. पारंपरिक संस्कृतीचा वारसा व शेतकर्‍यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. प्राण्यांचा होणारा छळ रोखण्यासाठी जनजागृती करणार्‍या पेटा या संस्थेने बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी सर्वप्रथम केली. फक्त मागणीच केली नाही तर त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना अतिशय अमानवीपणे त्याचा छळ करण्यात येतो, असे मत त्यांनी यावेळी मांडले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर 2017 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर याला यश आले असून, सर्वोच्च न्यायालयाने हा पारंपारिक खेळ असून, इतर राज्यात सुरू असतांना, महाराष्ट्रात बंदी का, असा सवाल करत या बैलगाडा शर्यतील सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडणार हे नक्की. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देखील ही लढाई जिंकली असली तरी या निकालानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे.
बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली, तरी ही शर्यतींचा इतिहास जाणून घेणे मोठी रंजक गोष्ट आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला असता, ईशान्य स्पेनमध्ये 14 व्या शतकात बैलांसमोर धावण्याची परंपरा सुरू झाली. ‘एन्सिएरो ऑफ पॅम्प्लोना’ असे नाव असलेल्या या शर्यतीत त्वेषाने धावणार्‍या बैलांसमोर जीवाच्या आकांताने पळताना अनेक जणांना उत्साह वाटत असे. 18-19 व्या शतकात स्पेनपासून अनेक मैल अंतरावर असलेल्या आशिया खंडात, सुरुवातीला आपल्या भारत देशात, ग्रामीण भागात दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जात असे. बैलांचा प्रजोत्पादनासाठी मर्यादित राहिलेला वापर पुढे सामान, कृषी उत्पादन आणि मानवी वाहतुकीसाठीही होऊ लागला. बैलाच्या आक्रमक स्वभावाचा अन्यत्र उपयोग व्हावा, या हेतूने आधी बैलगाडी अस्तित्वात आली. बैलाची मालकी आणि देखभाल करणे हा अभिमानाची गोष्ट मानली जात असे. ज्यांना परवडत होते, त्यांनी बैलगाडी शर्यतीत उतरवण्यासाठी बैलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात या खेळाला शंकरपट म्हणूनही ओळखले जाते. कर्नाटकात कंबाला, तामिळनाडूत रेकला, तर पंजाबमध्ये बौलदा दी दौड या नावाने ही शर्यत ओळखली जाते. याशिवाय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बैलगाडा शर्यती खेळल्या जातात. ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. त्यामुळे बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी बैलांना प्रशिक्षण दिले जाते. बघ्यांसाठी पर्वणी असलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जात असे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच या शर्यती आयोजित करता येणार आहे. तसेच बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.शर्यतीदरम्यान बैलांना क्रूरपणे वागणूक देता येणार नाही. तसेच राज्य सरकारने केलेल्या नियमावलींचे पालन करूनच या शर्यतींचे पालन करावे लागणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी सरकारने उठवावी या मागणीसाठी राज्यभर आत्तापर्यंत अनेक आंदोलने देखील झाले आहेत. मात्र, अद्यापही बैलगाडा शर्यत सुरु करण्यात आली नाही. या संदर्भात खासदारांनी संसदेत मागणी केली. आमदारांनी आंदोलन केले. मात्र, ही बंदी उठवण्यात आली नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी तर संसदेच्या मागील अधिवेशनात तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री गिरीराजसिंह यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती.

COMMENTS