विश्‍वास देशमुख यांची कोरोना सेंटरला आर्थिक मदत

Homeमहाराष्ट्रसातारा

विश्‍वास देशमुख यांची कोरोना सेंटरला आर्थिक मदत

मोरणा विभागातील कोकिसरे गावचे दानशूर व्यक्तीमत्व आणि सामाजिक तसेच प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे विश्‍वासराव देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाटण

राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी राम नाईक
समताच्या सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधेचा शुभारंभ
शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान

पाटण / प्रतिनिधी : मोरणा विभागातील कोकिसरे गावचे दानशूर व्यक्तीमत्व आणि सामाजिक तसेच प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे विश्‍वासराव देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाटण येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांच्या औषधोपचारार्थ आर्थिक मदत पाटणचे तहसीलदार योगेश्‍वर टोंपे यांच्याकडे सुपूर्द केली.

मोरणा विभागातील प्रत्येक अडीअडचणीला उभे राहणारे मग ते गावातील मंदीर, शैक्षणिक संस्था असो अथवा स्मशानभूमी वा एखाद्या व्यक्तीच्या ऑपरेशनसाठीचा खर्च असो यासाठी विश्‍वासराव देशमुख हे नेहमी अगेसर असतात. त्यांनी शैक्षणिक संस्थेतील मुलींनाही दत्तक घेवून त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्विकारली आहे. गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि देखील ते स्वत: भरतात. मागील वर्षी कोरोनाकाळातही त्यांनी गोरगरीब लोकांना अन्न-धान्याचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सध्या पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाला थोपविण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. त्याच पध्दतीने पाटण शहरातील सामाजिक बांधव आपापल्या परीने आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मदत रूपी सहकार्य करत आहेत. त्यामुळे बाधितांबरोबर कुटुंबियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पाटणचे तहसीलदार योगेश्‍वर टोंपे यांनी पाटण कोविड सेंटरसाठी आपल्या एका महिन्याचे वेतन दिल्यानंतर सामाजिक भावनेतून अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. नुकतेच मोरणा विभागातील समााजिक कार्यकर्ते विश्‍वासराव देशमुख यांनीही तहसीलदार यांची भेट घेवून मदती संदर्भात इच्छा व्यक्त केली. तात्काळ आर्थिक मदतही सुपूर्द केली. सामाजिक बांधिलकीतून बाधितांसाठी केलेली मदत लाख मोलाची असून बाधितांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत पाटणचे तलाठी जयेश शिरोडे, ज्येष्ठ पत्रकार विक्रांत कांबळे, पत्रकार नितीन खैरमोडे, संदीप भोळे, श्रीगणेश गायकवाड उपस्थित होते.

COMMENTS