मुंबई/प्रतिनिधी : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील बसचा अपघात डुलकीमुळेच झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून समोर आले आहे. गेल्या शनिवारी या महामार्गा
मुंबई/प्रतिनिधी : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील बसचा अपघात डुलकीमुळेच झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून समोर आले आहे. गेल्या शनिवारी या महामार्गावरचा सर्वात भीषण अपघात झाला. यात तब्बल 25 जण होरपळून ठार झाले. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर नोंदवल्या गेले आहेत. शनिवारी विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला झालेल्या अपघाताच्या घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला असून यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने या भीषण अपघाताची चौकशी केली. या चौकशीचा अहवाल आला असून अनेक धक्कादायक बाबी यात उघड झाल्या आहेत. हा अहवाल बुलडाणाच्या जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती. ही लेन वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी आहे. या लेनमध्ये असतांना बसचा वेग हा जास्त होता. चालकाला डुलकी लागल्याने आधी बसचे समोरचे चाक हे महामार्गाच्या साईन बोर्डला धडकले. यानंतर बस पलटी होऊन ती दहा फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली. या घटनेत बसचा मागील टायर फुटला तसेच बसचा एक्सेल तुटून तो वेगळा झाल्याने डिझेल टँकवर आदळला डिझेल टँकमधील तब्बल 360 लिटर डिझेल सर्वत्र सांडले. हे तेल इंजिनच्या गरम भागाच्या संपर्कात आल्याने पेटले. यामुळे अल्पवधीत बसने देखील पेट घेतला आणि तब्बल 25 प्रवाशांचा होपळून मृत्यू झाला. दरम्यान, तपासात या बसने अनेक वाहतुकीचे नियम मोडल्याचे देखील तपासात आढळले. या बसची पियूसी देखील संपली होती. त्यामुळे बसला 2021मध्ये 1200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच बसचे फिटनेस प्रमाणपत्र देखील नव्हते. अयोग्य लाईटचा वापर केल्याने तब्बल 4 हजार 500 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. दरम्यान, फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याने 23 हजार 500 रूपए दंड ठोठावण्यात आला होता. या बसवर तीन वर्षात 45 हजारांहून अधिकची चलने फाडण्यात आली आहेत. जो दंड तीन वर्षात भरला नाही तो दंड बसचे जळून सांगाडे झाल्यावर भरण्यात आला आहे.
COMMENTS