Homeताज्या बातम्यादेश

जैन मुनींची निर्घृण हत्या

कूपनलिकेत सापडले मृतदेहाचे तुकडे

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जैन मुनींची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. मुनींची निर्घृण हत्या कर

तरूणीचा आढळला डोके, हात, पाय नसलेला मृतदेह
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे !
पोलिस ठाणे व कर्मचार्‍यांच्या निवास स्थानासाठी निधी द्या

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जैन मुनींची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. मुनींची निर्घृण हत्या करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते कूपनलिकेत टाकण्यात आलेत. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज असे हत्या झालेल्या जैन मुनींचे नाव आहे. हिरेकुडी येथे नंदीपर्वत आश्रम आहे. या आश्रमाचे मुनी आचार्य श्री 108 कमकुमार नंदी महाराज आहेत. 6 जून रोजी सकाळी आठ वाजता ते शेवटचे दिसले होते. त्यानंतर मठाजवळ असलेल्या भाविकांनी त्यांना पाहिले नाही. एक दिवस वाट पाहिली सर्वत्र शोधाशोध झाली. मात्र मुनींचा शोध लागला नाही. त्यामुळे आश्रमाच्या ट्रस्टींनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी वेगात तपासाला सुरुवात केली. शनिवारी खोदकाम करत कूपनलिकेतून मुनींच्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले. सदर मुनी गेल्या 15 वर्षांपासून नंदीपर्वत आश्रमात राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी तपासावेळी मठात कधी कोणती व्यक्ती आली होती याची माहिती घेतली. त्यानुसार तपासात दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींच्या चौकशीत त्यांनी आपण पैशांच्या वादातून मुनींची हत्या केल्याची तोंडी कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS