Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव उपनगरातून हळद फिटण्या अगोदर नववधू पसार

अहमदनगर प्रतिनिधी/ प्रेम आंधळ असतं हे सर्वश्रुत आहे परंतु प्रेम खरंच वेडच असतं याची प्रचिती नुकत्याच झालेल्या घटनेवरून आली. नुकतीच लग्न झालेली

कोपरगावमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात
शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात
सर्वांच्या सहकार्याने भिंगार बँकेची घोडदौड सुरु राहिल – चेअरमन अनिलराव झोडगे

अहमदनगर प्रतिनिधी/ प्रेम आंधळ असतं हे सर्वश्रुत आहे परंतु प्रेम खरंच वेडच असतं याची प्रचिती नुकत्याच झालेल्या घटनेवरून आली. नुकतीच लग्न झालेली नववधू हळद फेडण्याकरिता माहेरी आल्यानंतर अचानक घरातून निघून गेली ती अद्याप परतली नाही. नगर शहराच्या उपनगर भागात राहत असलेल्या एका मुलीचे लग्न नुकतेच झाले लग्न झाल्यानंतर नववधू सासरी गेली व रीतीरीवाजा प्रमाणे हळद फेडण्याकरिता ती नववधू माहेरी आली. मात्र हळद फेडण्याऐवजी माहेरी आल्यानंतर संधी साधून नववधू बेपत्ता झाली तिच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला की जे मैत्रिणी नातेवाईक यांच्याकडे सर्वांकडे चौकशी करून पाहणे केली परंतु सदर नववधू कोठेही मिळून आली नाही. अधिक चौकशी केली असता त्याच दिवशी गावातील एक तरुण ही बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्याने गावात उलट सुलट चर्चा सुरू झाली.
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीरुन मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्याच परिसरात राहणार्‍या एका मुलावर संशय व्यक्त केला. या प्रकरणी पोलिस हवालदार गाजरे शोध घेत आहेत. त्याच बरोबर केडगाव मधून 22 वर्षाचा एक तरुण बेपत्ता असल्याची माहिती मुलाच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी हरवल्याची नोंद केली. मात्र, या दरम्यान, बेपत्ता मुलीच्या नातवेाईकांनी संशयी मुलाच्या घरी जावून तुमचा मुलगा कोठे आहे व आमच्या मुलीला कोठे ठेवले असे विचारणा केली असता दोन्ही कुटुंबात शिवीगाळ अरेरावी होवून हाणामारी झाली. या घटनेत एकास जबर मार लागल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. तर दुसर्‍या बाजुला मुलीचे नातेेवाईक मुलीचा सर्वत्र शोध घेत आहेत. यामुळे केडगाव शास्त्री नगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

COMMENTS