Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्राझीलचा सत्ता संघर्ष ! 

ब्राझीलच्या संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर रविवारी उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थ

सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचे काय ?
वेगळ्या विदर्भासाठी मेख कोणती ! 
अन्यथा, नव्वदीच्या दशकाप्रमाणे सत्ताकारण अस्थिर होईल !

ब्राझीलच्या संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर रविवारी उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी हल्लाबोल केला. राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्व्हाने याला ब्राझीलमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर लोकांना ६ जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीत झालेल्या संघर्षाची आठवण झाली. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप समर्थकांनी कॅपिटल वास्तूवर आक्रमण केलं होतं. परंतु ब्राझील संसदेवरील हा लागोपाठ दुसरा हल्ला म्हणता येईल. कारण, लुला डी सील्वा  यांना सत्ता मिळाल्यानंतर जवळपास ४८ तास सत्ता देण्यास नकार दिला होता. त्याचवेळी हे स्पष्ट झाले होते की, आगामी काळात जगभरात हुकुमशहांचा उदय होत असून, लोकशाही प्रक्रियेचे खच्चीकरण होत असल्याचे दिसून आले होते.

अमेरिकेत  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर देखील त्यांनी आपला पराभव मान्य करण्यास नकार देऊन, आपल्या समर्थकांकरवी थेट अमेरिकन संसदेवरच हल्ला चढवला होता. अर्थात, या घटनेवर त्यांची जो बायडेन सरकारने नंतरच्या काळात सखोल चौकशी सुरू केली असून त्यांच्यावर अनेक धाडीही त्यानंतर घालण्यात आल्या. परंतु, ब्राझील सारख्या या देशातही असा प्रकार व्हावा, ही घटना केवळ त्या देशाच्या दृष्टीनेच नव्हे तर एकूणच जागतिक राजकारणाच्या दृष्टीने चिंताग्रस्त करणारी आहे असे म्हणावयास हरकत नाही! ब्राझीलचे न्यायमंत्री फ्लॅव्हिओ डिनो यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २०० लोकांना अटक करण्यात आली आहे.

ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. बोलसोनारो त्या निवडणुकीत पराभूत झाले. मात्र त्यांनी हा निकाल मानण्यास सातत्याने नकार दिला. गेल्या आठवड्यात लुला यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहिले नव्हते. ब्राझील मधील या हल्ल्याच्या संदर्भात जो बायडेन प्रशासनाने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. आहे स्वतः जो बायडेन यांनी या हल्ल्याची निंदा करत अशा प्रकारचा लोकशाही वरील हल्ला याचा अमेरिका निषेध करीत असून कुठल्याही परिस्थितीत नव्या सरकारला स्थापनेसाठी नव्या सरकार सोबतच अमेरिकन प्रशासन राहील आणि ब्राझीलच्या जनतेला आश्वस्त करेल, अशा प्रकारे त्यांनी आपली ट्विट करून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दळणवळण मंत्री पालो पिमेन्ता यांनी एक व्हीडिओ ट्वीट करून लिहिले की, आम्ही इन्स्टिट्यूशनल सेक्युरिटी ऑफिस रुममध्ये असताना इथल्या प्रत्येक ब्रीफकेसमध्ये धोकादायक आणि बिगरधोकादायक शस्त्रं होती. आंदोलनकर्त्यांनी ही शस्त्रं चोरली, असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्राझील मधील सत्ता संघर्षात हा सलग दुसरा हल्ला आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात लुला डी सिल्वा यांनी जेऊर बालसुनारा यांचा पराभव करून सत्ता हातात घेतली. परंतु, बाल्सोनारा यांनी सत्तेचे हस्तांतरण करण्यास नकार देऊन जवळपास ४८ तास नवनिर्वाचित सरकारला सत्ता सोपवली नाही. यावरून उजव्या विचारसरणी किती टोकाला पोहोचल्या आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. फक्त चार महिन्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा सत्तेवरील हल्ला, हा एकूणच जगाच्या दृष्टीने चिंताजनक बनला आहे. कारण, अलीकडच्या काळात जगातील सर्वच सत्ताधीश हे आपली सत्ता चिरस्थायी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्याच पठडीत चीन, रशिया यांचेही सत्ताधीश आपापल्या देशातील सत्तास्थानी कायम राहण्यासाठी तशा प्रकारच्या दुरुस्त्या कायद्यामध्ये करून घेत आहेत. परंतु, अमेरिका आणि ब्राझील यांच्यामध्ये सत्ता हस्तांतरणाच्या काळात झालेला हिंसक हल्ला, हा जगाचं एकूण राजकीय स्वरूप कसं बदललं आहे, हे स्पष्ट करणार आहे!

COMMENTS