नाशिक- अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवडच्या रेणुका माता मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त जागर जोगवा कार्यक्रम आयोजित केला आहे.
नाशिक- अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवडच्या रेणुका माता मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त जागर जोगवा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम स्व. चतुर्भुज बजरंगलाल चौधरी प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे आयोजित केला असून, चांदवड येथील श्री रेणुका देवी संस्थान आणि नाशिकचे चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. यांची मोलाची साथ या उपक्रमाला मिळते आहे. शनिवारी, २८ ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपासून सुरु होणार असलेल्या जागर जोगवा कार्यक्रमात ३१ भजनी मंडळातील ७०० हून अधिक महिला भाविक सहभागी होऊन देणुकादेवीची आराधना करतील.
सध्या नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आहे. या पार्श्वभुमीवर कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत श्री रेणुका देवी संस्थान, चांदवड येथे 31 भजनी मंडळाचा जागर जोगवा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ध्वजारोहण व ढोल ताशांसह टाळ, मृदुंगाच्या गजरात श्री रेणुकादेवी पालखी सोहळा आयोजित केला जाणार आहे. तसेच महिला भाविकांच्या उपस्थितीत भव्य जागर जोगवा व सुरेल भजनांचा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरातील भजनी मंडळांचा तसेच गुरुजनांचा सन्मान सोहळादेखील यावेळी पार पडेल. एकाचवेळी 700 महिलांचा महाआरती सोहळा आणि 501 पणत्यांचा दिपोत्सव उपस्थित भाविकांसाठी अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य समन्वयक म्हणून जितेंद्र येवले आणि योगेश कासार हे काम बघत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन या अध्यक्षा तृप्तीदा काटकरः सचिव संगिता वेढणेः उपाध्यक्षा पद्मीनी काळेः सहसचिव मंजुळा धर्माधिकारी व उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
COMMENTS