नवी दिल्ली ः सत्ताधारी व विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच नाराज झाले. त्यांनी गदारोळामुळे संसद कशी चालणार? असा प्रश्न उ

नवी दिल्ली ः सत्ताधारी व विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच नाराज झाले. त्यांनी गदारोळामुळे संसद कशी चालणार? असा प्रश्न उपस्थित करत कामकाज स्थगित केले. राहुल गांधींची माफी व अदानी प्रकरणी झालेल्या गदारोळामुळे सोमवारी सकाळी स्थगित झालेले संसदेचे कामकाज दुपारी पुन्हा सुरू झाले. राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच ते मंगळवापर्यंत तहकूब झालेत. लोकसभेचे कामकाज काहीवेळ चालले. पण भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या तीव्र गदारोळामुळे लोकसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
COMMENTS