Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस , राष्ट्रवादीमुळेच सीमावर्ती भाग अविकसित – अ‍ॅड. आंबेडकर

काँग्रेस राष्ट्रवादीचे शिंतोडे उद्धव ठाकरेंनी स्वतःवर ओढवून घेऊ नये

मुंबई/प्रतिनिधी - सीमावर्ती भागातील विकासाचा आणि पायाभूत सोयी-सुविधांचा मुद्दा आता ऐरणीवर आला असला तरी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे या

अखेर 73 वर्षांनंतर फुकेवाडी ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार
‘माय कॉलेज खोज’ कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
सोनं-चांदी स्वस्त होणार
मुंबई/प्रतिनिधी - सीमावर्ती भागातील विकासाचा आणि पायाभूत सोयी-सुविधांचा मुद्दा आता ऐरणीवर आला असला तरी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे या भागातील गावे अविकसित राहिल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका करतांना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे अपयश असून, या अपयशाचे शिंतोडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेंने स्वतःवर ओढवून घेऊ नये, असा इशारा देखील त्यांनी दिला.

महापुरुषांच्या अवमानाला विरोध म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच महामोर्चा निघायला हवा होता, असे मतही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले. राजकीय आघाडी व आंदोलन वेगवेगळे ठेवल्यास शिवसेनेवर सीमाभागाच्या अविकासाचे शिंतोडे उडणार नाही, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. आजच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करायला नको होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. महामोर्चाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सीमावाद. महाराष्ट्राच्या सीमेवरील गावे आज कर्नाटकात, गुजरातमध्ये, तेलंगणात, कर्नाटकात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांचा विकासच होत नसेल तर ते काय बोलणार? मात्र, याला जबाबदार कोण? आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात भाजप सत्तेवर नंतर आले आहेत. त्यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच राज्यावर अधिक काळ सत्तेत होती. त्यामुळे विकास न झाल्यामुळे ही गावे आज आक्रोश करत असतील तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच संपूर्ण दोषी आहेत. शिवसेनेने लवकरात लवकर यातून आपले अंग काढून घेतले नाही तर त्यांच्यावरही याचे शिंतोडे उडल्याशिवाय राहणार नाही. आपण महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, असे म्हणत नसून केवळ आंदोलन आणि राजकीय आघाडी यात फरक करावा, असे सांगत आहोत, असे स्पष्टीकरण अ‍ॅड. आंबेडकरांनी दिले.

 

COMMENTS